Graduate Election Agrowon
ताज्या बातम्या

MLC Election : पदवीधर मतदार संघात २ लाख ६२ हजार मतदार

पाच जिल्ह्यांमध्ये एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ तथा सामान्य प्रशासन उपायुक्त रमेश काळे यांनी दिली.विभागात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात आहेत.

Team Agrowon

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर (Graduate Election) मतदारसंघ निवडणुकीसाठी येत्या ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency) अंतिम मतदारयादी जाहीर झाली आहे.

त्यानुसार विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ तथा सामान्य प्रशासन उपायुक्त रमेश काळे यांनी दिली.विभागात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात आहेत.

नगरमध्ये १ लाख १५ हजार ६३८ मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यात ३५ हजार ५८, धुळे जिल्ह्यात २३ हजार ४१२ तर नंदूरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ मतदार आहेत.

विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे

नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्रे नगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे.

नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

Pending Water Charges: ताकारीचे पाणी पाहिजे, आधी थकीत पाणीपट्टी भरा

MPSC Paper Leak : ‘एमपीएससी’ पेपरफुटीची सखोल चौकशी करा

Farmer Demands: मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Land Revenue Code: भडगाव तहसीलदारांचा पाय खोलात

SCROLL FOR NEXT