Nagpur News : कागदोपत्री १५१ शेतकऱ्यांचे धान्य तारण ठेवल्याचे भासवीत २ कोटी दहा लाख रुपयांचे कर्ज उचलल्याप्रकरणी तब्बल पाच वर्षांनंतर मौदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामकृष्ण माणिकराव निंबूळकर (वय ४५, रा. हिंगणा बराभाई) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला.
याप्रकरणी मौदा पोलिसांनी रमण्णाराव मुसलिया बोल्ला (रा. हनुमान मंदिर, कळमना, नागपूर), वाकलपुडी वीर व्यंकटराव सत्यनारायण (रा. मेनरोड, पारशिवणी), कॉर्पोरेशन बॅंकेचे नागपूर शाखेतील संबंधित अधिकारी, गोदामात बोगस अर्जदारांची नावे नोंदवून घेणारा अधिकारी अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
रमण्णाराव बोल्ला हा या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असून त्याचा मौदा शहरात राईसमिल आहे. या सर्वांनी संगनमत करुन गुमथळा येथील गोदामात १५१ शेतकऱ्यांचे धान्य जमा केल्याचे कागदोपत्री दाखविले.
त्याआधारे कॉर्पोरेशन बॅंकेच्या किंग्जवे शाखेकडून २ कोटी १० लाख ३८ हजार ४०७ रुपयांची उचल करण्यात आली. दरम्यान शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस प्राप्त होताच हा घोटाळा चव्हाट्यावर आला. विशेष म्हणजे यातील सहा जणांकडे शेती नसताना त्यांच्या नावे कर्जाची उचल करण्यात आली.
दरम्यान १ एप्रिल २०२० रोजी कॉर्पोरेशन बॅंक युनियन बॅंक ऑफ इंडियात विलीन करण्यात आली. या दोन्ही बॅंकांचे अंकेक्षण होत असताना हा गैरप्रकार उघडकीस कसा आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तारण धान्यावर ७० टक्के पर्यंत अल्प मुदतीचे कर्ज देण्याची सोय आहे. परंतू २ कोटी १० लाख इतकी रक्कम वाटप करताना बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी गोदामात जात शहनिशा कशी केली नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
अशी मिळविली कागदपत्रे
राज्य सरकारकडून ओल्या दुष्काळापोटी आर्थिक मदत मिळणार आहे, अशी थाप मारीत शेतकऱ्यांकडून बॅंक खाते उघडण्याशी संबंधित कागदपत्रे मिळविण्यात आली. शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेत बॅंक खाते उघडले व नंतर कर्जाचे धनादेश स्वतःकडे ठेवले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.