Agricultural Electricity
Agricultural Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : पाच हजार कृषी ग्राहकांकडे १९१ कोटी थकले

Team Agrowon

नगर ः वारंवार थकीत देयकाची (Electricity Arrears) रक्कम भरण्यासाठी आवाहन करून, तसेच विविध योजना राबवूनही महावितरणच्या (Mahavitaran) आवाहनास प्रतिसाद मिळालेला नाही.

पाच वर्षांहून अधिक देयके थकवणाऱ्या आणि मंजूर जोडभार ७.५ अश्वशक्तीपेक्षा अधिक असणाऱ्या कृषी ग्राहकांच्या शेती पंपाचा (Agriculture Pump) वीजपुरवठा (Power Supply) खंडित करण्याची मोहीम कोकण प्रादेशिक विभागासह अहमदनगर मंडळात सुरू करण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्यातील ५ हजार १५६ शेतकऱ्यांनी १९१ कोटी ९२ लाख रुपये थकवले आहेत. जिल्ह्यात ५ ते १० वर्षांत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणाऱ्या कृषी ग्राहकांची संख्या २ हजार ९५९ आहे.

या ग्राहकांकडे १०२ कोटी ३५ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये ७.५ ते १० अश्वशक्ती असणारे २ हजार १८५ ग्राहक, १० ते २० अश्वशक्ती असणारे ६८६ आणि २० अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणाऱ्यांची संख्या ८८ आहे.

१० ते १५ वर्षात शेतीपंपाच्या देयके थकवणाऱ्या कृषी ग्राहकांची संख्या १ हजार ५९४ असून, या ग्राहकांकडे ६३ कोटी १९ लाख रुपये थकबाकी आहे.

त्यामध्ये ७.५ ते १० अश्वशक्ती असणारे १ हजार २४४ ग्राहक, १० ते २० अश्वशक्ती असणारे ३२७ आणि २० अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणाऱ्यांची संख्या २३ आहे.

१५ वर्षापेक्षा जास्त थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांची संख्या ६०३ असून, या ग्राहकांकडे २६ कोटी ३६ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये ७.५ ते १० अश्वशक्ती असणारे ४८२ ग्राहक, १० ते २० अश्वशक्ती असणारे ११० आणि २० अश्वशक्ती पेक्षा जास्त जोडभार मंजूर असणाऱ्यांची संख्या ११ आहे. अशी एकूण १९१ कोटींची थकबाकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT