Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : रत्नागिरी जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १९ हजार ५१५ शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा उतरवला आहे.

Team Agrowon

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १९ हजार ५१५ शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा उतरवला आहे. यामध्ये भात पिकातील १८ हजार ७९८ तर नाचणीचे ७१७ शेतकरी आहेत.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा पट वाढ झाली आहे. तीन दिवसांच्या वाढीव मुदतीमध्येही दहा हजार शेतकऱ्यांनी विमा उतरवला.

पूर्वी पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा एक रुपयात पीकविमा योजना शासनाने जाहीर केली. ३१ जुलैपर्यंत याची अंतिम मुदत होती; परंतु मुसळधार पाऊस, शेतीची चालू असलेली कामे यामुळे तीन दिवस मुदत शासनाने वाढवली होती. जिल्ह्यात भातासाठी हेक्टरी ५० हजार तर नागलीसाठी २० हजार रुपये विमा रक्कम संरक्षित केली आहे.

सध्या ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात दोन्ही पिकांचे मिळून १० हजार २९६ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. वाढीव मुदतीत दहा हजार शेतकऱ्यांची भर पडली. त्यामुळे मुदत संपल्यानंतर १९ हजार ५१५ शेतकऱ्यांचे ५ हजार ७३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले. जिल्ह्यातून २४ कोटी ७५ लाख ६१ हजार ९३६ रुपयांची रक्कम संरक्षित झाली आहे.

यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे खरिपातील लावण्यांची कामे उशिराने झाली. दहा वर्षांतील पावसाची अनियमितता पाहता कापणीच्यावेळी शेतकऱ्यांना अवकाळी पावसातील नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ मिळू शकतो. मागील दोन वर्षांत विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता.

विमा योजनेत शेतकरी सहभागी व्हावेत यासाठी कृषी विभागाकडून गावनिहाय नियोजन केले होते. याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. यंदा सर्वाधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT