Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : मराठवाड्यात १९ लाख हेक्टर पेरणीविना

Kharif Season 2023 : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ऊस वगळता खरीप पिकांखालील एकूण क्षेत्रापैकी २९ लाख ४ हजार ८४१ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ऊस वगळता खरीप पिकांखालील एकूण क्षेत्रापैकी २९ लाख ४ हजार ८४१ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. १९ लाख ५२ हजार २१० हेक्टर क्षेत्रावर अजूनही पेरणी बाकी आहे. पावसाचा लहरीपणा पेरणीच्या मुळावर उठला असून काही ठिकाणी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचीही वेळ आली आहे.

यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ऊस वगळता खरीप पिकांखालील सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार ५१ हेक्टर इतके आहे. या क्षेत्राच्या तुलनेतील २९ लाख ४ हजार ८४१ हेक्टरवर अर्थात ६० टक्के क्षेत्रावर १२ जुलैपर्यंत पेरणी आटोपली होती. म्हणजे अजूनही १९ लाख ५२ हजार २१० हेक्टर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४० टक्के क्षेत्र नापेर आहे.

पीकनिहाय पेरणीची स्थिती लक्षात घेता एकाही पिकाची सरासरी क्षेत्रात इतकी पेरणी झाली नाही. तूर, उडीद, मुगाची तसेच खरीप ज्वारी, बाजरीची पेरणी अत्यल्य असल्याने या क्षेत्रात आता पाऊस आला तरी वाढ होईल की नाही अशी स्थिती आहे. जसजसा पाऊस लांबतो आहे, तसतसं शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

पेरणी झालेल्या भागात अनेक शेतकऱ्यांना पावसाने मारलेल्या दडीने दुबार पेरणीची वेळ आली आहे. काही भागात उपलब्ध पाण्याच्या साहाय्याने उगवलेली पीक वाचविण्याची कसरत करताना शेतकरी दिसत आहेत.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, पेरणीचे क्षेत्र पाहता, धाराशिव जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वात कमी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक पेरणी झाली आहे.

जिल्हानिहाय सर्वसाधारण क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा.. सर्वसाधारणक्षेत्र...प्रत्यक्ष पेरणी.. टक्केवारी

लातूर... ५९९४५६.... ३६३७८१... ६१

धाराशिव... ५०४७३५.. २०६३५०.... ४१

नांदेड... ७६६८०९... ४६१६१२... ६०

परभणी...५३४९०० ...३३७२७८.....६३

हिंगोली ...३६१०५४... २२६६९९ ...६३

छ.संभाजीनगर..६८४७१६..५०००५३... ७३

जालना ....६१९५९५ ...३३७४७१ ...५४

बीड ....७८५७८६ ....४७१५९७ ....६०

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक... सर्वसाधारण क्षेत्र.... प्रत्यक्ष पेरणी... टक्केवारी

भात.. ४१०२... ६८.... २

खरीप ज्वारी... १०६६०५... ११९९५.... ११

बाजरी.... १२९९९५..... ३४९४०.... २७

मक्का..... २७२६४७.... १६६६२४... ६१

इ. कडधान्य... ५०३९..... ११२४.... २२

तूर....... ४९१५३७.... १८६९६८.... ३८

मूग.... १६४१३६.... ३७९५३.... २३

उडीद..... १४६६७६..... ४५४२०.... ३१

इ. कडधान्य.. ५३२०...... ६११..... ११

भुईमूग.... १९०६४..... ४७६९...... २५

कारळ.... २८९०...... १४६....... ५

तीळ..... ७६५४...... ४०३....... ५

सूर्यफूल.... ३१३८ ..... ५...... ०

सोयाबीन... १९५०६९२.... १४३१२५१.. ७३

इ.गळीतधान्य... ३१८१ ....५१६.....१६

कपाशी..... १५४४४१२.... ९८२०५१.. ६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT