Seed Agrowon
ताज्या बातम्या

Mahabeej Seed : ‘महाबीज’कडून १५ हजार क्विंटल बियाणे ‘रिजेक्ट’

Seed Production : लातूर जिल्हा सोयाबीनचा हब आहे. त्यामुळे महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित)चे सुद्धा लातूर जिल्ह्यावर अधिक लक्ष असते.

Team Agrowon

Latur News : लातूर जिल्हा सोयाबीनचा हब आहे. त्यामुळे महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित)चे सुद्धा लातूर जिल्ह्यावर अधिक लक्ष असते. महाबीज बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून त्यांचे सोयाबीन घेते. त्यापासून बियाणे तयार करून ते पुन्हा बाजारात आणले जातात.

या वर्षी जिल्ह्यातील ८८७ शेतकऱ्यांनी २५ हजार ४५ क्विंटल सोयाबीन महाबीजला बियाणासाठी दिले होते. सर्व तपासण्या झाल्यानंतर यातील १५ हजार क्विंटल बियाणे रिजेक्ट करण्यात आले आहे. तर ९ हजार ९४८ क्विंटल बियाणे पास झाले आहे. बाजार भावापेक्षा वीस ते २५ टक्के अधिक भाव महाबीजने बियाण्याला दिला आहे.

लातूर जिल्ह्यात सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर पेरा होत आहे. पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरले जात आहे. त्यामुळे जिल्हा सोयाबीनचे हब बनत चालला आहे. व्यापाऱ्यांसोबतच महाबीजचे देखील या जिल्ह्यावर अधिक लक्ष असते.

दरवर्षी बियाणे तयार करण्यासाठी महाबीज शेतकऱ्यांकडून सोयाबीन घेते. त्याची उगवण क्षमतेच्या वेगवेगळ्या तपासण्या करून उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा अधिक निघाली तरच ते बियाणे पास केले जाते अन्यथा रिजेक्ट करून ते बियाणे परत शेतकऱ्यांना दिले जाते.

यावर्षी ८८७ शेतकऱ्यांनी २५ हजार ४५ क्विंटल सोयाबीनचे बियाणे महाबीजला दिले होते. वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर महाबीजने १४ हजार ९७ क्विंटल बियाणे रिजेक्ट केले आहे. तर ९ हजार ९४८ क्विंटल बियाणांची उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा अधिक निघाल्याने ते पास करण्यात आले आहे. जुने व नवीन अशा दोन वाणांचे हे बियाणे आहे.

नवीन वाणाच्या बियाणाला सरासरी सहा हजार ८४१ रुपये तर जुन्या वाणाला सरासरी सहा हजार ५६९ रुपये क्विंटलला भाव महाबीजने दिला आहे. बाजारातील सोयाबीन पेक्षा वीस ते २५ टक्के अधिक भाव महाबीजने यावर्षी दिला आहे.

महाबीज शेतकऱ्यांकडून सोयाबीन घेऊन त्याचे बियाणे तयार करते. या करिता सोयाबीनच्या बियाणाची उगवण क्षमता ७० टक्केपेक्षा अधिक आहे का ती पाहिली जाते. या करिता वेगवेगळ्या पाच तपासण्या केल्या जातात. त्यानंतरच बियाणे पास किंवा रिजेक्ट केले जाते. यावर्षी २५ हजार ४५ क्विंटल पैकी नऊ हजार ९४८ क्विंटल बियाणे पास झाले आहे. बाजारपेठे पेक्षा २० ते २५ टक्के अधिक भाव दिला जात आहे. जिल्ह्यात यावर्षी महाबीजने २३ हजार ६७१ क्विंटल बियाणे बाजारात आणले आहे.
- आर. एस. मोराळे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT