Tribal Farming : आदिवासी समाजाच्या उपजीविकांच्या साधनांमध्ये मोहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात मोहाच्या बियांपासून खाद्यतेल निर्मिती केली जाते. या मोहाच्या बियांचा गाळप हंगाम तेजीत आहे. ग्रामीण भागातील लोक मुरबाड येथे गिरणीत तेल गाळण्यासाठी येतात.
सध्या खाद्यतेलांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे खाद्यतेलांच्या महागाईच्या काळात गोरगरिबांना मोहाच्या तेलामुळे मोठा दिलासा मिळत आहे. सध्या घाण्यावर मोहफळांच्या गाळणीच्या हंगाम पावसाळ्यात सुरू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात मोहफुलांचा हंगाम उशिराने सुरू होतो. मेअखेरीस मोहाची फळे येतात.
याबिया तेलाने भरलेल्या असतात. यातून आदिवासींना हक्काचा रोजगार मिळतो. मोहाचे झाड आदिवासी समाजाला त्याच्या बहुआयामी उपयोगामुळे वरदान ठरते. मोहाच्या झाडाची फांदी, पाने, फळे, फुले, साली आणि लाकूड या साऱ्यांचाच उपयोग केला जातो.
मोहाची फुले मार्च- एप्रिलमध्ये झाडांना फुले येतात. फुले खाण्यासाठी गुरांची झुंबड उडते. लोक ही फुले वेचतात. ती वाळवून, कुजवून त्याची दारू तयार केली जाते. ही फुले विकण्यास बंदी आहे; परंतु वनखात्याच्या परवानगीने त्यांची विक्री करता येते. मोहाच्या फुलांपासून दारू बनविली जाते.
हिच्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण अधिक असल्याने या दारूला मागणी अधिक असते. मात्र सध्या ही दारू तयार करण्यास बंदी आहे. पेंड मोहोटीचे तेल काढताना बियांचा चोथा उरतो, त्याला पेंड म्हणतात.
डासांना पळविण्यासाठी वाळलेले शेण व मोहाची पेंड एकत्र करून त्याची धुरी केली जाते. मोहोटी मोहाच्या फळांच्या बियांना मोहोटी असे म्हटले जाते. मोहाच्या व इतर झाडाखाली पडलेल्या बिया वेचून त्या फोडल्या जातात व त्या सुकवून त्यापासून तेल काढले जाते.
मोहोटीच्या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी; तसेच ताप आल्यावर हाता-पायांच्या तळव्यांना चोळून ताप उतरवण्यासाठी केला जातो. पावसाळ्यातील गारठ्यात या तेलाचा शरीराला चांगला फायदा होतो. झाडांची साले खरुज व हिरड्यांतून रक्त थांबवण्यासाठी मोहाच्या झाडाच्या सालापासून काढा तयार केला जातो. सर्पदंशावर औषध म्हणूनही साल गुणकारी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.