Nashik News अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या (Adulterate Food) विरुद्ध धडक मोहीम सुरु केली आहे. मनमाड शहरात सहायक आयुक्त (अन्न), उ. सी. लोहकरे, विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, नि. खं. साबळे यांच्या पथकाने २८ एप्रिलला आईसाहेब स्वयंसहायता बचतगट दूध संकलन व शीतकरण केंद्रावर धाड टाकली. यात तपासणीअंती बारा हजार लिटर दूध नष्ट (Milk Adulteration) करण्यात आले आहे.
येथील आईसाहेब स्वयंसहायता बचतगट दुध संकलन व शितकरण केंद्र येथे धाड टाकली असता त्याठिकाणी दुध संकलन व शितकरणाचे कामकाज सुरु असल्याचे आढळून आले. ठिकाणी ३ वेगवेगळ्या टँक बीएमसी असून त्यामध्ये एकत्रित १२ हजार लिटर दुध हे संकलित करुन शितकरण केलेले साठविलेले आढळले.
त्याच लगतच्या गाळ्यात तपासणी अंती एका विना लेबलच्या खुल्या प्लॅस्टिक बॅगमध्ये अंदाजे १० किलो व्हे पावडर साठविलेले आढळून आले. त्या ठिकाणी साठविलेल्या दुधाच्या साठ्यात या पावडरची भेसळ होत असल्याच्या संशयावरून अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले.
एक हजार ६०० किमतीचा पावडरचा उर्वरित आठ किलो साठा जप्त करण्यात आला. तसेच ४ लाख ५६ हजार किमतीचे नाशवंत दूध पावडरची भेसळ केल्याच्या संशयावरून नष्ट केला. या प्रकरणी घेतलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.