Irrigation Project Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation Project : पाच सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी १२ कोटींची मंजुरी

अंजना पळशी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, डावा व उजवा व त्यावरील वितरण प्रणालीच्या बांधकामास २५ वर्षाचा कालावधी झालेला असून, बांधकामे ही दगडी आहेत.

Team Agrowon

Aurangabad News : जिल्ह्यातील पाच सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती औरंगाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी दिली. यामध्ये अंजना पळशी मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८३ लाख रुपये निधी मंजुरीचा समावेश आहे.

यामध्ये औरंगाबाद, कन्नड, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यांतील सांजूळ लघू प्रकल्प, अंबाडी मध्यम प्रकल्प, गंधेश्‍वर लघू प्रकल्प, अंजना पळशी मध्यम प्रकल्प आणि पूर्णा नेवपूर मध्यम प्रकल्पाचा यात समावेश आहे.

जिल्ह्यातील ४० प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी ८० कोटी रुपये निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे पाठविलाअसल्याचे श्री. निंभोरे म्हणाले.

अंजना पळशी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, डावा व उजवा व त्यावरील वितरण प्रणालीच्या बांधकामास २५ वर्षाचा कालावधी झालेला असून, बांधकामे ही दगडी आहेत. प्रस्तावित सा.क्र. मधील वितरण प्रणाली ही काही ठिकाणी काळ्या मातीमधून आहेत.

तसेच टेकडी डोंगर माथ्याच्या उतार जवळून वितरण प्रणाली व त्यावरील बांधकामाची बहुतांश ठिकाणी मोडतोड झालेली असून, नादुरुस्त स्थितीत आहे. कालव्यातून पाण्याचा झिरपा मोठ्या प्रमाणात होताना दिसतो.

परिणामी, कालवे व वितरण प्रणालीची वहनक्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे मुख्य कालवा व कालवा दुरुस्तीची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे अंजना पळशी सांडव्यातून अल्प प्रमाणात गळती होत असल्यामुळे सांडवा दुरुस्ती आवश्यक आहे.

या पार्श्‍वभूमीवर अंजना पळशी, ता. कन्नड या मध्यम प्रकल्पाच्या मुख्य धरण व कालव्याच्या कामांचे अंदाजपत्रकास विशेष दुरुस्तीअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

त्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादअंतर्गत अंजना पळशी या मध्यम प्रकल्पाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत रु. ४ कोटी ८३ लाख ४२ हजार ८५ रुपये एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास अटींच्या अधीन राहून सोबतच्या प्रपत्रानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

प्रकल्पस्थिती अशी...

अंजना पळशी मध्यम प्रकल्प हा अंजना नदीवर पिशोर गावाच्या पश्‍चिमेस सिल्लोड कन्नड रोडवर ०.५ किलोमीटर अंतरावर १९९८ मध्ये पूर्ण झालेला आहे. प्रकल्पास डावा व उजवा असे दोन मुख्य कालवे प्रत्येकी ११ किलोमीटर लांबीचे असून, २०३० हेक्टर सिंचन निर्मिती संकल्पित आहे.

प्रकल्पाचे पूर्ण जलाशय पातळीचा पाणीसाठा १५.५५ द.ल.घ.मी. इतका असून, पूर्ण जलाशय पातळीचा नक्त साठा १३.७४ द.ल.घ.मी. एवढा आहे. तर मृत साठा हा १.८१ द.ल.घ.मी. इतका आहे. प्रकल्पाच्या सांडव्याची लांबी २०८ मीटर इतकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT