Sugar Factory
Sugar Factory  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : ‘एफआरपी’ १०९ साखर कारखान्यांनी थकविली

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Sugarcane Season : राज्‍याचा गळीत हंगाम संपला असला तरी एप्रिलअखेर हंगाम सुरू केलेल्या २१० पैकी १०९ साखर कारखान्यांनी अद्याप ‘एफआरपी’ची (FRP) पूर्ण रक्कम दिलेली नाही.

८० साखर कारखान्यांनी ८० ते ९९ टक्‍क्यांपर्यंत रक्कम दिली आहे. यंदा १ हजार ५२ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) करण्यात आले. याची ‘एफआरपी’ची रक्कम ३३ हजार २७८ कोटी रुपये इतकी होती. या पैकी ३२ हजार ९७९ कोटी रुपये शेतकऱ्यांना कारखान्यांनी दिले आहेत.

६० ते ८० टक्क्‍यांपर्यंत १९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना रक्कम दिली आहे. ० ते ५९ टक्क्यांपर्यंत १० साखर कारखान्यांनी रक्कम अदा केली आहे. अजूनही १ हजार ४१७ कोटी रुपयांची रक्कम कारखान्यांकडे थकित आहे.

कारखान्यांनी एफआरपी न दिल्याने ८ साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अजूनही १०९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची पूर्ण रक्कम दिली नाही.

यंदाच्या गळीत हंगामाने सुरुवातीचे अंदाज चुकविले आहेत. हंगाम मध्यापर्यंत येईपर्यंत साखरेचा दर किमान विक्री मूल्याच्या (३१०० रुपये) जवळपास होता. जानेवारीनंतर हळूहळू साखरदरात वाढ होऊ लागली. सुरुवातीला क्विंटलला ५० रुपयांपासून दर वाढू लागले. या कालावधीपर्यंत एफआरपी देण्‍याचा वेगही कमी होता.

जानेवारीपर्यंत ७५ साखर कारखान्यांनीच एफआरपीची रक्कम दिली. गेल्या दोन महिन्यांत साखरेला एमएसपीपेक्षा क्‍विंटलला २०० रुपयांपर्यंत दर वाढले. उन्हाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर साखरेला ही मागणी वाढू लागली.

त्‍याचा सकारात्मक परिणाम कारखान्यांच्‍या आर्थिक परिस्थितीवर झाला. यामुळे एफआरपी देण्‍याला गती आली. असे असले तरी अद्यापही शंभराहून अधिक कारखान्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम देणे शक्‍य झालेले नाही.

थोडक्यात महत्त्वाचे...

- अजूनही १ हजार ४१७ कोटी रुपये एफआरपी थकित

- ८ साखर कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत कारवाई

- कारखान्यांनी ३३ हजार २७८ कोटींपैकी ३२ हजार ९७९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले

एफआरपी देण्यात कोल्हापूर, पुणे, नगर विभाग आघाडीवर

सध्याही उन्‍हाळ्यामुळे साखरेला मागणी आहे. दरही समाधानकारक आहेत. यामुळे नजीकच्‍या काळातही काही प्रमाणात तरी शिल्लक थकबाकीची रक्कम कारखाने देऊ शकतील, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. एफआरपी देण्यात कोल्हापूर, पुणे, नगर विभाग आघाडीवर आहेत. अन्य विभागांत मात्र अनेक कारखान्यांना शंभर टक्के एफआरपी देण्यात अडचणी येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

SCROLL FOR NEXT