Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : माणिकडोह धरणक्षेत्रात १०८ मिलिमीटर पाऊस

टीम ॲग्रोवन

पुणे : जवळपास पंधरा दिवसानंतर पुन्हा पावसाला (Rainfall) सुरूवात झाली आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर (Rain Intensity Dam Area) वाढला आहे. गुरूवारी (ता.८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये माणिकडोह धरणांच्या पाणलोट (Manikdoh Dam Catchment Area) क्षेत्रात १०८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या पावसामुळे ओढे, नाले पुन्हा भरून वाहू लागले आहेत.

जिल्ह्यात दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे धरणांच्या आवकेत काहीशी घट झाली होती. गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नव्याने ५.४० टीएमसी पाण्याची आवक झाली. जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरत आली आहेत. काही धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडला आहे. परिणामी, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

माणिकडोह धरणापाठोपाठ येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही ९३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. उजनी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ८७ मिलिमीटर, टेमघर २०, वरसगाव २२, पानशेत २२, खडकवासला ३१, पवना ५९, कासारसाई २६, कळमोडी ६४, चासकमान ५१, भामा आसखेड ८१, आंध्रा ७५, वडिवळे ८३, शेटफळ ८३, नाझरे ७४, गुंजवणी २७, भाटघर १३, नीरा देवघर १२, वीर ५५, पिंपळगाव जोगे ३२, वडज ५८, डिंभे ८१, तर विसापूरच्या पाणलोट क्षेत्रात २४ मिलिमीटर पाऊस पडला.

विसर्गात पुन्हा वाढ

ठोकरवाडी घाटमाथ्यावर ६३ मिलिमीटर, शिरोटा ८८, वळवण ८२, लोणावळा ९७ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे मागील काही दिवसांत धरणांतून कमी करण्यात आलेला विसर्गात पुन्हा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. हलक्या जमिनीतील पिके वाफसा स्थितीत आली होती. हलक्या जमिनीत पिकांना पाण्याची आवश्यकता होती. त्यातच पाऊस झाल्याने पिकांना चांगलाच आधार मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT