Tomato Rate agrowon
ताज्या बातम्या

Tomato Price : टोमॅटोचा भाव वाढलेलेच, केंद्र सरकारचा दर नियंत्रणासाठी आटापिटा

Tomato Rate : राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये एक किलोला १०० ते १२० या दराप्रमाणे टोमॅटोची विक्री सुरू आहे.

Team Agrowon

Tomato Market Rate : मागच्या दिड महिन्यांपासून वाढलेले टोमॅटोचे भाव अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. सामान्यांच्या घरातून टोमॅटो गायबच झालेला आहे. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये टोमॅटोच्या दरात किंचीत फरक असल्याने कोणत्याही प्रमुख बाजार पेठांत टोमॅटोची आवक वाढली नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान कोल्हापूर शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरातील बाजारपेठेत अद्यापही अपेक्षित आवक बाजारात झालेली नाही. त्यामुळे टोमॅटोचा दर वाढलेलाच आहे.

सध्या कोल्हापुरातील बाजारपेठांमध्ये एक किलोला १०० ते १२० या दराप्रमाणे टोमॅटोची विक्री सुरू आहे. टोमॅटोच्या दर्जानुसार यामध्ये दरात कमी- जास्त फरक आहे. मागच्या दोन आठवड्यापासून टोमॅटोची किंचीत आवक वाढल्याने दुर्मीळ झालेला टोमॅटो दिसत आहे. परंतु दरामध्ये फरक पडलेला नाही. अशातच पाऊस थांबल्याने पुन्हा रोगराई वाढण्याच्या शक्यतेने बाजारात भाज्यांची आवक कमी होण्याची शक्यता आहे.

सध्या बाजारात १०० ते १२० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे. ग्राहक येतात दराची चौकशी करतात; पण टोमॅटो घेत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांच्या घरातून टोमॅटो अजूनही गायबच आहे. महागड्या टोमॅटोकडे ग्राहकांनीच पाठ फिरवली आहे.

केंद्राकडून टोमॅटो दरावर नियंत्रण

देशात टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकार नेपाळमधून आयात करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत सांगितले. पण भाव वाढले म्हणून खडबडून जागे झालेले सरकार दोन महिन्यांआधी टोमॅटो फेकून देत होते, तेव्हा निर्यातीसाठी पुढे का आले नाही, असा सवाल शेतकरी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

निर्मला सितारामन म्हणतात

नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली-NCR मध्ये 70 रुपये प्रति किलो अनुदानित दराने टोमॅटोची मेगा विक्रीची योजना करण्यात येणार आहे. एनसीसीएफने आजपर्यंत राजस्थान, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये ८ लाख ८४ हजार ६१२ किलो टोमॅटो विकले आहेत. हे पुढील दिवसांमध्ये सुरू राहील. तसेच पुरवठा वाढवला ​​जाईल असेही त्या म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ind-Us Trade Deal : अमेरिकेचा नवसाम्राज्यवाद आणि दादागिरी

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT