bunds Agrowon
ताज्या बातम्या

Water Bunds : कुडाळात एका दिवसात बांधणार १ हजार बंधारे

भूगर्भातील पाणीसाठा वाढावा म्हणून जिल्ह्यात गेल्या सहा-सात वर्षांपासून प्रत्येक तालुक्यातील नदी-नाल्यांवर बंधारे घालण्याचा उपक्रम जिल्हा परिषद राबविते.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समिती शुक्रवारी (ता. २३) बंधारा दिन (Water Bunds) साजरा करणार असून या दिवशी एका दिवसात तब्बल एक हजार बंधारे बांधण्याचा संकल्प पंचायत समितीने केला आहे.

भूगर्भातील पाणीसाठा वाढावा म्हणून जिल्ह्यात गेल्या सहा-सात वर्षांपासून प्रत्येक तालुक्यातील नदी-नाल्यांवर बंधारे घालण्याचा उपक्रम जिल्हा परिषद राबविते. अनेक भागातील पाणीटंचाई निर्मूलनासाठी बंधारे उपयोगी ठरले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरअखेरपासून बंधारे लोकसहभागातून बांधण्यास सुरुवात केली जाते.

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि विविध संस्थांच्या माध्यमातून हे बंधारे उभारले जातात. कुडाळ पंचायत समिती २३ डिसेंबर हा दिवस बंधारा दिन म्हणून साजरा करते. यावर्षी पंचायत समितीच्या वतीने एकाच दिवशी १ हजार बंधाऱ्यांचा संकल्प करण्यात आला आहे.

या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal HTBT Cotton Seed: जांगडगुत्ता ‘एचटीबीटी’चा!

Rabi Onion Cultivation: रब्बीत कांद्याची विक्रमी लागवड

Agri College Student Death Case: कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू

Sugarcane Crushing Season: पुणे जिल्ह्यात गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

Pomegranate Production: ‘महाधन सोल्यूटेक’मुळे मिळेल अधिक डाळिंब उत्पादन

SCROLL FOR NEXT