Brinjal Variety : वांग्याच्या कोणत्या सुधारित जातींची निवड कराल?

Brinjal Crop : महाराष्ट्रात वांगी पिकाच्या बऱ्याच जातींची लागवड केली जाते. वेगवेगळया विभागात रंग व आकारानुसार तसेच काटेरी व बिनकाटेरी अशा विविध जातींची लागवड केली जाते.
Brinjal
BrinjalAgrowon
Published on
Updated on

Brinjal Vegetable Crop : ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वांनाच आवडणारी आणि वर्षभर उपलब्ध होणारी वांगी ही सर्वसामान्य लोकांच्या आवडीची फळभाजी आहे. वांग्याचा आहारामध्ये भाजी, भरली वांगी, भरीत, दही वांगी अशा अनेक प्रकारे उपयोग होतो.

विविध भागानुसार लोकांच्या आवडी विशिष्ट वांग्याच्या जातींसाठी वेगवेगळया आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची चविष्ठ वांगी प्रसिध्द आहेत. अहमदनगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात. तर खानदेशात भरताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय असून विदर्भात कमी काटे असलेली वांगीच सर्वांना आवडतात.

वांगी हे पीक जवळच्या तसेच लांबच्या बाजारपेठांच्या दृष्टीने फायदेशीर पीक आहे. महाराष्ट्रातील हवामानात वांगी पिकाची लागवड तिन्ही हंगामात करता येते. खरीप हंगामासाठी बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवडयात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. वांग्याच्या लागवडीसाठी सुधारित किंवा संकरित वाण निवडताना ठराविक बाबींचा विचार करावा.

प्रामुख्याने त्या परिसरातील लोकांची मागणी असणारा वाण तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळणारा वाण निवडावा. निवडलेला वाण शक्यतो भरपूर उत्पादन देणारा व रोग आणि किड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा असावा.

वांगी पिकाची लागवड करताना प्रामुख्याने सुधारीत व संकरित जातीची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पध्दत , खत व पाणी व्यवस्थापन व पीकसंरक्षण या बाबी महत्वाच्या आहेत. महाराष्ट्रात वांगी पिकाच्या बऱ्याच जातींची लागवड केली जाते. वेगवेगळया विभागात रंग व आकारानुसार तसेच काटेरी व बिनकाटेरी अशा विविध जातींची लागवड केली जाते.  

Brinjal
Kharif Jowar Variety : धान्य, कडबा उत्पादनासाठी ज्वारीच्या कोणत्या वाणाची निवड कराल?

सुधारित व संकरित जाती

मांजरी गोटा    

या जातीचे फळ मध्यम ते मोठया आकाराचे, गोल असून जांभळट गुलाबी रंगाचे असते व त्यावर पांढरे सरमिसळ पट्टे असतात. व फळांच्या देठावर काटे असतात ही जात चवीला रूचकर असून फळे चार ते पाच दिवस टिकू शकतात. या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल मिळू शकते.

कृष्णा    

ही संकरीत जात असून झाडे काटक असतात. फळांचा आकार अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात व फळांच्या देठावर व पानांवर काटे असतात. या जातीचे सरासरी ४०० ते ४५० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

Brinjal
Mung, Urad Variety: मूग, उडिद लागवडीसाठी कोणत्या सुधारित जाती निवडाव्यात?

फुले हरित    

या जातीची फळे मोठया आकाराची असतात, ही जात भरीत करण्यासाठी चांगली आहे. या जातीच्या फळाचा रंग फिकट हिरवा व टोकाकडे पांढरे पट्टे असतात. ही जात खरीप हंगामासाठी चांगली आहे. या जातीचे सरासरी २०० ते ४८० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

फुले अर्जुन 

वांग्याची ही संकरित जात आहे.फळे मध्यम आकाराची. फळांचा रंग हिरवा. त्यावर जांभळे व पांढरे पट्टे असतात. फळांचा आकार गोलाकार व थोडासा लांब. देठावर काटे असतात. ही जात खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे. उत्पादन ४५० क्विंटल प्रतिहेक्‍टरी मिळू शकते.   

याशिवाय वांग्याच्या आणखी विविध जाती काही संस्थांनी तसेच खाजगी कंपन्यांनी विकसीत केल्या आहेत. काही जाती ठराविक भागातच चांगल्या मागणी असलेल्या असतात. वांग्याची शक्यतो आवडीनुसार जात निवडणे बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचे असते. निवडलेली जात शक्यतो किड व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणारी व भरघोस उत्पादन देणारी असावी. म्हणजे बाजारभाव चांगला मिळून चांगला फायदा मिळू शकेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com