Team Agrowon
अलीकडे काढणीच्या वेळी पडणारा अतीपाऊस, वाढता कीड, रोगाचा प्रादुर्भाव अशा अनेक कारणांमुळे मूग उडीदाच्या लागवडीत घट होऊ लागली आहे. तरिही काही शेतकरी मूग, उडदाची लागवड मुख्य व आंतरपीक म्हणून करतात.
कमी कालावधीमध्ये येणारी व अधिक आर्थिक नफा मिळवून देणारी पिके म्हणून मूग आणि उडीद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. मूग आणि उडीद जमिनीचा पोत सुधारण्याचेही काम करतात.
मुगाचे पीकेव्ही ग्रीनगोल्ड हे वाण अधिक उत्पादन देणारं असून लवकर व एकाच वेळी पक्व होणारे आहे. हे वाण साधारणपने ६८ ते ७२ दिवसात काढणीला तयार होतं. हे वाण भुरी रोगास मध्यम प्रतिकारक असून वाणाची सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल आहे.
मुगाचे पीकेव्ही -८८०२ हे लवकर व एकाच वेळी पक्व होणार वाण आहे. हे वाण भुरी रोगास मध्यम तसेच मावा या रस शोषक किडीस साधारण प्रतिकारक आहे. हे वाण साधारणपने ६० ते ६५ दिवसात तयार होते तर या वाणाची सरासरी उत्पादकता १० ते ११ क्विंटल आहे.
उडदाच्या टीएयू-१ या वाणाची राज्यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड होते. हे वाण भुरी रोगास मध्यम प्रतिकारक असून पक्वतेचा कालावधी ६५ ते ७२ दिवसांचा आहे. या वाणाची सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल आहे.
उडदाचे पीकेव्ही उडीद-१५ केवडा आणि भुरी रोगास प्रतिकारक आहे. या वाणाची सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल आहे.
उडदाचे तीसरे महत्वाचे वाण म्हणजे पीडीकेव्ही ब्लॅकगोल्ड हे वाण अधिक उत्पादन देणारे आहे. या वाणाचा पक्वतेचा कालावधी ७१ दिवसांचा आहे असून सरासरी उत्पादकता १३ ते १५ क्विंटल आहे.