Soluble Fertilzer Use : विद्राव्य खतांची फवारणी केंव्हा करावी?

Soluble Fertilzers : पिकाच्या अन्नद्रव्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पिकाच्या वाढीची अवस्था आणि जमिनीतील ओलावा यानुसार योग्य त्या विद्राव्य खतांचा वापर केल्‍यास जास्त फायदा होतो.
Soluble Fertilzer Use
Soluble Fertilzer UseAgrowon
Published on
Updated on

Soluble Fertilzers Spraying : पिकाच्या अन्नद्रव्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पिकाच्या वाढीची अवस्था आणि जमिनीतील ओलावा यानुसार योग्य त्या विद्राव्य खतांचा वापर केल्‍यास जास्त फायदा होतो. विद्राव्य खते का वापरावीत?, विद्राव्य खतांचं महत्त्व आणि विद्राव्य खतांची फवारणी नेमकी केंव्हा करावी? याविषयीची माहिती घेऊया.

रासायनिक खताचे भौतिक गुणधर्म, आकार, घनता यावरून घन खते, द्रव खते, पाण्यात विरघळणारी म्हणजेच विद्राव्य खते असे प्रमुख तीन प्रकार पडतात. विद्राव्य खते ही घन खताप्रमाणेच असतात. पण ती पाण्यात विरघळणारी असतात. याशिवाय विद्रायव्य खतामध्ये एक किंवा अन्य अन्नद्रव्यांचा समावेश असू शकतो.

Soluble Fertilzer Use
Soluble Fertilizers Use : पिकाला विद्राव्य खते कशी उपयुक्त आहेत?

विद्राव्य खते का वापरावी?

हवामानातील बदल, जमिनीचा प्रकार, सुपीकता, ओलावा, उपलब्ध अन्नद्रव्ये, पीक संरक्षण आणि व्यवस्थापन या सर्व बाबींचा पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर परिणाम दिसून येतो. त्याच प्रमाणे पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याची गरज बदलत असते. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जमिनीतून एकदा किंवा दोन वेळा विभागून रासायनिक खते देतो.पण विद्राव्य खते सिंचनाच्या पाण्यासोबत देता येत असल्यामुळे पिकाच्या गरजेप्रमाणे अनेक वेळा विभागून देता येतात. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लागत नाही. तातडीने पुरवठा करायचा असल्यास फवारणीद्वारेही विद्राव्य खते देता येतात.

विद्राव्य खतांचे महत्त्व

विद्राव्य खते ही रासायनिक घन खतांच्या तुलनेत पिकांना लवकर उपलब्ध होतात. अन्नद्रव्याचा लगेच पुरवठा करायचा असल्यास ही खते फवारणी करुनही देता येतात. विद्राव्य खतांमुळे पिकांचे उत्पादन आणि रासायनिक खताचा वापर यात सांगड घालणं सोपं जातं. याशिवाय या खतांमुळे जमिनीच्या गुणधर्मावर परिणाम होत नाही. तसचं विद्राव्य खते ही अनेक वेळा विभागून देता येतात. विद्राव्य खते पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेतून निचरा होण्याची किंवा वायुरूपात वाया जाण्याची शक्यता कमी असते.

विद्राव्य खतांची फवारणी केंव्हा करावी?

पिकाला जास्त दिवसांपासून जमिनीतून खत देणे शक्य न झाल्यास विद्राव्य खताची फवारणी करावी. जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे रासायनिक खताची मात्रा देण्यासाठी उशीर होत असल्यास आणि भरपूर पाने-फुले असताना आवश्यकतेप्रमाणे जमिनीमधून खतांचा पुरवठा होत नसल्यास विद्राव्य खतांची फवारणी करावी. विशेष करुन पिकामध्ये कमतरतेची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने अन्नद्रव्याच्या पुरवठ्यासाठी फवारणीतून खते देण्याचं नियोजन करावं.

अशाप्रकारे विद्राव्य खताची निवड करुन फवारणी योग्य वेळेस केल्यास खते वाया न जाता त्या खताचा योग्य वापर होईलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com