Team Agrowon
सुक्ष्मसिंचनातून आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी पाण्यात संपूर्ण विरघळणाऱ्या खतांचा वापर केला जातो.
विद्राव्य खते प्रामुख्याने फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात.
पिकांची पाने अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. परंतु या पद्धतीने अन्नद्रव्यांचे शोषण फारच कमी प्रमाणात केले जाते.
दर्जेदार फळांच्या उत्पादनासाठी योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर महत्त्वाचा आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर फळवर्गीय पिकांना फारच उपयुक्त आहे.
फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. परंतु फवारणीतील खते अचानक निर्माण झालेल्या पानांतील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतात.