Flower Harvestning : फुले अधिक काळ टिकविण्यासाठी काय कराल?

फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य हे ७० % त्यांच्या काढणीच्या वेळेवर तर उर्वरित ३० % हे काढणीनंतरच्या घटकांवर अवलंबून असते.
Flower Harvestning
Flower HarvestningAgrowon

फुलांचे काढणीनंतरचे (Flower Harvestning ) आयुष्य हे ७० % त्यांच्या काढणीच्या वेळेवर तर उर्वरित ३० % हे काढणीनंतरच्या घटकांवर अवलंबून असते. फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य हे फुलांची परिपक्वता, फुले काढणीची पद्धत तसेच फुलांची काढणीनंतरची हाताळणी, फुलांचे पॅकिंग, वाहतुकीच्या योग्य पद्धती आणि साठवणीच्या पद्धती यांवर अवलंबून असते. 

Flower Harvestning
जनावरांना किटोसीस होऊ नये म्हणून काय कराल? | Ketosis in Cow | ॲग्रोवन

फुलांचे प्रिकुलींग करणे आवश्यक 

काही फुलांच्या बाबतीत सकाळी आठ वाजता काढलेल्या फुलांपेक्षा संध्याकाळी चारच्या सुमारास काढलेली फुले जास्त काळ टिकतात. कारण संध्याकाळी काढलेल्या फुलांमध्ये कोर्बोहायड्रेटचे प्रमाण सकाळी काढलेल्या फुलांपेक्षा जास्त असते. त्यामुळे फुलांची काढणी केलेली असते त्यावेळेस फुलामध्ये उष्णता असते. आणि त्या उष्णतेमुळे फुलांचा  श्वसनाचा दर वाढतो. वाढलेल्या श्वसनाचा दरामुळे फुलांमधील पाणी हवेमध्ये उडून जाते त्यामुळे फुलांची गुणवत्ता, रंग, वजन कमी होते. त्यामुळे फुलांमधील जास्त असलेली उष्णता काढणे गरजेचे असते. ती काढण्यासाठी फुलांचे प्रिकुलींग करणे गरजेचे असते. हायड्रोकुलींग, रेफ्रीजरेशन आणि फोर्स्ड एअर कुलींग या प्रीकुलींगच्या पद्धती आहेत. 

Flower Harvestning
दुग्धजन्य पदार्थ टिकविण्यासाठी आधुनिक तंत्र

काढणीनंतर फुले अधिक काळ ताजी कशी ठेवायची

- साखर हा फुलांच्या अन्नद्रव्यातील मुख्य घटक असतो. साखर फुलांना अन्नाचा पुरवठा करते आणि बायोसाईड अन्नद्रव्यामधील सूक्ष्मजीव, जिवाणू आणि विषाणू कमी करते.

- ३.० ते ३.५ पीएच असलेले शुद्ध पाणी फुलांसाठी वापरावे. जर पाण्याचा पीएच जास्त असेल तर पाण्यामध्ये सूक्ष्मजीव आणि जिवाणूंची वाढ होते आणि ते फुलांचे आयुष्य कमी करतात.

- साखर फुलांना अन्नाचा पुरवठा करते. त्यामुळे फुलांची काढणी केल्यांनंतर ती अधिक काळापर्यंत ताजी राहावीत यासाठी १० ते २० ग्रॅम साखर प्रती लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून या द्रावणात फुले ठेवावीत. जर आपण या प्रमाणा पेक्षा अधिक साखरेचा वापर केला तर फुलांचे आयुष्यचक्र लवकर पूर्ण होते आणि फुले लवकर कोमुजून जातात. त्यामुळे पाण्यामध्ये साखरेचे प्रमाण इष्टतम ठेवावे.

- बायोसाईड हे रसायन पाण्यातील सूक्ष्मजीव नष्ट करते. जिवाणूंची वाढ कमी करते. फुलांची अन्नघटक आणि पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढविते. त्यामुळे काढणीनंतर फुले बायोसाईडच्या द्रावणात ठेवली जातात. 

संपर्क - बालाजी जाधव :  09420090899

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com