Kharif Crop Fertilizers : खरीप पिकांना पेरणीच्या वेळी कोणती खते द्यावीत?

Kharif Crop Sowing : पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिकाला शिफारशीत प्रमाणात खते दिली जातात. मातीपरिक्षणानूसार पिकाला खते दिल्यामुळे पिकाची अन्नद्रव्याची नेमकी गरज भागवली जाते. कोरडवाहूमध्ये पिकांना रासायनिक खते दिल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Kharif Season : पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिकाला शिफारशीत प्रमाणात खते दिली जातात. मातीपरिक्षणानूसार पिकाला खते दिल्यामुळे पिकाची अन्नद्रव्याची नेमकी गरज भागवली जाते. कोरडवाहूमध्ये पिकांना रासायनिक खते दिल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

पीक १० ते १५ दिवस अगोदर तयार होते. रासायनिक खताच्या (Chemical Fertilizer) वापरामुळे सुरुवातीपासून पीक जोमदार वाढते. फुलोरा ८ ते १० दिवस अगोदर येतो.

रासाय़निक खताची मात्रा पेरणीच्या वेळी दिल्यास अधिक फायदेशिर ठरते. खते पिकाला लागू होण्यासाठी ती बियापासून फार लांब पडू देऊ नये. त्यासाठी दुचाडी पाभरीचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरते. खरीप हंगामातील कापूस, तूर, मूग -उडीद, भुईमूग आणि मका पिकाला पेरणीच्या वेळी कोणती खते द्यावीत याविषयीची माहिती पाहुया. 

कापूस

कोरडवाहू बिटी कापूस पिकास १२०:६०:६० किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी ४८ किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. बागायती बिटी कापूस पिकास १५०:७५:७५ किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी ३० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. कापूस पिकाची लागवड १५ जूलै पर्यंत करता येते. 

तूर 

२५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. तुर पिकाची लागवड १५ जूलै पर्यंत करता येते. 

Kharif Sowing
Soybean Fertilizer Use : सोयाबीनला कोणती खते द्यावीत?

मूग/उडीद 

पेरणीच्यावेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद हेक्टरी मात्रा द्यावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. 

भुईमूग 

२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. भुईमूग पिकाची पेरणी ७ जूलै पर्यंत करता येते. 

मका  

१५०:७५:७५ किलो नत्र, स्फुरद व पालाश रासायनिक खतमात्रापैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व ७५ किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.

------

माहिती आणि संशोधन - वसंतरान नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com