Team Agrowon
शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी शेणखत जमिनीत पसरून द्यावे. पेरणीच्या वेळी ५० किलो नत्र अधिक ७५ किलो स्फुरद अधिक ४५ किलो पालाश अधिक २० किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.स्फुरद देण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर केला तर अतिरिक्त गंधक देण्याची आवश्यकता नाही परंतु गंधकरहित खतांचा ( १८:१८:१०,१२:३२:१६,१०:२६:२६ डीएपी) वापर केला तर गंधक २० किलो प्रती हेक्टर द्यावे.
पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. सर्व रासायनिक खते पेरणीच्या वेळेसच द्यावीत.पेरणी नंतर नत्रयुक्त खतांचा वापर माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी-जास्त करावी.
पेरणीसाठी ट्रॅक्टरचलित पेरणी व खत यंत्राचा वापर केल्यास खते बियाण्याच्या ५ ते ७ सेंमी खाली पडेल अशा रीतीने पेरणी करावी. बियाण्यास खतांचा स्पर्श होऊ देऊ नये.
पिकाची फेरपालट करावी.
पेरणी वेळेवर करावी ( १५ जुलै पूर्वी). पेरणी ही उतारास आडवी पूर्व पश्चिम करावी.
१०० टक्के शुद्ध दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे.पेरणीपूर्वी बियाणांची उगवणशक्ती तपासून मगच पेरणी केल्यास झाडांची संख्या उत्तम राखता येईल.
जमिनीच्या पोतानुसार पेरणीचे अंतर ठेवावे.( ४५ x ५ सेंमी. किंवा ३० x १५ सेंमी) बियाणे ३.५ ते ४ से.मी पेक्षा खोल पेरू नये.