
महाराष्ट्रातील प्रमुख नगदी मसाला पीक म्हणून हळद पीक (Turmeric Crop) ओळखलं जात. मराठवाड्यात विशेषतः हिंगोली परभणी व नांदेड या जिल्ह्यांमध्ये हळदीच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत.
सध्या बऱ्याच ठिकाणी हळद काढणी (Turmeric Harvesting) झालेली आहे तर काही ठिकाणी काढणी सुरु आहे. त्यामुळे काढणीनंतर चांगल्या प्रतीच्या हळदीसाठी हळदीवर योग्य प्रकारे प्रक्रिया (Turmeric Processing) होण गरजेच आहे.
हळदीवर प्रक्रिया करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिलेली माहिती पाहुया.
हळद काढणीनंतर जास्तीत जास्त दोन दिवसात शिजवून घ्यावी. जेठे गड्डे व अंगठे गड्डे एकत्र शिजवू नयेत.
रोगट हळद प्रक्रियेसाठी घेऊ नये. शेणाने सारवलेल्या पृष्ठभागावर हळद वाळू घालू नये. हळदीच्या चांगल्या रंगासाठी हळदीच्या पावडर शिवाय कोणतेही रसायन वापरू नये.
आधी ओली आणि वाळलेली हळकुंडे एकत्र मिसळू नयेत. खराब जागेवर किंवा पोत्यामध्ये हळद साठवून ठेवू नये.
कुरकुमीनचे जास्त प्रमाणात असलेल्या जातीची निवड करावी.
हळद पक्व होण्यापूर्वी काढणी करू नये. काढणी करताना गड्ड्यांना इजा होऊ देऊ नये. म्हणून शिजवण्यासाठी समप्रमाणात उष्णता द्यावी.
उच्च प्रतीची व टिकाऊपणासाठी शिजवलेली हळद एकसारखी वाळविणे व त्यासाठी वाळविण्याची क्रिया फरशीवर किंवा सिमेंट काँक्रीटवर साधारण पाच ते सात सेंमी जाडीचा थर पसरून वाळवावी.
हळद एकसारखी वाळावी म्हणून गड्ड्यांची उलथापालत करावी.
हळद वाळवण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा दिवस लागतात. ताज्या गड्ड्याच्या वजनाच्या सुमारे २० % वाळलेली हळकुंडे मिळतात.
हळकुंड वाळवून चांगली टणक झाल्यानंतर पॉलिश करावी. जेणेकरून ती सोनेरी पिवळी, चमकदार व गुळगुळीत बनतील व त्यांना चांगला बाजारभाव मिळतो.
त्यासाठी हाताने चालविण्याचे लाकडी ड्रम यंत्र दोन माणसे दोन तासात ५० ते ६० किलो हळद पॉलिश करतील असे दोन अश्वक्तीची सिंगल फेज मोटर असणारे स्वयंचलित यंत्र वापरावे.
हळकुंडाची प्रत ही रंग, कुरकुमीनच प्रमाण, आकर्षकपणा व आकार यावर ठरत. हळकुंडाचा रंग गडद पिवळा असावा. कडूपणा कमी असावा.
हळकुंड दोन ते आठ सेमी लांब व एक ते दोन सेमी जाड असाव. त्यास मध्यभागी तोडले असता तुटलेला भाग सपाट नारंगी लाल असावा.
हळकुंडाचा पृष्ठभाग मेनचट व शिंगासारखा दिसावा, वास कस्तुरी काळीमिरी सारखा आणि स्वाद किंचित कडू असावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.