Poultry Farming : परसबागेतील कुक्कुटपालनासाठी वनराजा, ग्रामप्रिया, श्रीनिधी कोंबड्यांच्या जातीचं का करावं संगोपन?

परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी सुधारित जातींचे संगोपन करावे. हा पूरक उद्योग करताना परसबागेत संगोपन करण्यात येणाऱ्या कोंबडीमध्ये कोणते गुणधर्म असावेत, संगोपनाचे फायदे याची माहिती असणे आवश्यक आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

डॉ. आर.सी.कुलकर्णी, डॉ. के.वाय.देशपांडे, डॉ.आकाश मोरे

Poultry farming : परसबागेतील कुक्कुटपालन ही ग्रामीण भारतातील परंपरेने चालत आलेली शेतकरी जीवनपद्धती आहे. घरामागील अंगणात कुक्कुटपालन करताना देशी कोंबड्यांचे संगोपन (Rearing of indigenous chickens) केले जाते.

अंडी उत्पादनाच्या दृष्टीने देशी कोंबड्यांची क्षमता केवळ ७० ते ८० अंडी प्रति पक्षी प्रति वर्ष इतकी मर्यादित असून मांस उत्पादनही खूपच कमी असते.

तथापि, कोंबडीच्या सुधारित जातींसह परसबागेतील कुक्कुटपालन उत्पादनास सहजतेने चालना मिळू शकते. मांस आणि अंड्याचे वाढीव उत्पादन (Egg Production) मिळविता येते.

पारंपारिक शेतकऱ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, परसबागेतील कुक्कुटपालन हा कमी किमतीच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह एक सुलभ उद्योग ठरतो. ग्रामीण बेरोजगार, स्त्रिया व दुर्बल घटकांना अन्न व आर्थिक सुरक्षा पुरविण्यासाठी परसबागेतील कुक्कुटपालन हा एक उत्तम पर्याय आहे.

देशी कोंबडीची अंडी आणि मांस उत्पादन क्षमता कमी आहे. परंतु परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी सुधारित जातींचे संगोपन करावे.

हा पूरक उद्योग करताना परसबागेत संगोपन करण्यात येणाऱ्या कोंबडीमध्ये कोणते गुणधर्म असावेत, संगोपनाचे फायदे याची माहिती असणे आवश्यक आहे.

Poultry Farming
Indigenous Chickens Breed : देशी कोंबड्यांच्या विविध जातींची ओळख

जाती आणि वैशिष्टे

- उपयुक्त जाती: वनराजा, ग्रामप्रिया आणि श्रीनिधी

- गावाच्या परिस्थितीत अनुकूलता, स्व-प्रसार

- चांगली ब्रूडिंग क्षमता, मातृत्व क्षमता

- चांगली शारीरिक रचना, स्वभावाने कठोर

- आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याची क्षमता

- आकर्षक आणि रंगीत पिसारा

- भक्षकांपासून पळून जाण्याची क्षमता (पायांची सुदृढ ठेवण)

- उत्तम रोग प्रतिकारक शक्ती

वनराजा

- हैदराबाद येथील कुक्कुटपालन प्रकल्प संचालनालयाद्वारे विकसित सुधारित जात.

- अंडी आणि मांस उत्पादनासाठी फायदेशीर.

- आकर्षक पिसारा आणि लांब पाय असलेली कोंबडी. भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम. ४) उत्तम रोगप्रतिकार क्षमता आणि मुक्त संचार संगोपनासाठी जुळवून घेण्यास सक्षम.

- नियमीत आहार व्यवस्थेत नर वयाच्या १० व्या आठवड्यांत १.२ ते १.५ किलो.

- प्रथम वयात येण्याचे वय: १६० ते १७५ दिवस

- सरासरी वार्षिक अंडी उत्पादन ः १२० ते १४०.

ग्रामप्रिया

- हैदराबाद येथील कुक्कुटपालन प्रकल्प संचालनालयाद्वारे विकसित सुधारित जात.

-ग्रामीण व आदिवासी भागात अंडी उत्पादनासाठी उपयुक्त.

- कोंबडी मध्यम वजनी, पाय लांब व मजबूत.

- रोग प्रतिकार शक्ती उत्तम असते परंतु भविष्यात मर व रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लसीकरण करणे अधिक फायदेशीर.

- सहा ते सात आठवड्यात वजन ४००, ५०० ग्रॅम. या वेळी आपण त्यांना तणावमुक्त वातावरणात सोडू शकतो.

- कोंबडीचे वजन सहा महिन्यात १.६ ते १.८ किलोपर्यंत मर्यादित ठेवावे.

- १५ आठवड्यांच्या वयात कोंबड्याचे वजन सुमारे १.२ ते १.५ किलो असते. तंदुरी चिकन तयार करण्यासाठी वापरता येते.

- पहिले अंडी देण्याचे वय : १६० ते १६५ दिवस

- अंडी उत्पादन: वर्षभरात २३० ते २४० अंडी उत्पादनाची क्षमता. ते कमीत कमी पूरक आहारासह मुक्त संचार परिस्थितीत १६० ते १८० अंडी घालू शकतात.

श्रीनिधी

- हैदराबाद स्थित कुक्कुटपालन प्रकल्प संचालनालयाद्वारे विकसित सुधारित जात.

- अंडी आणि मांस उत्पादनासाठी फायदेशीर.

- या जातीतील कोंबड्या इतर सुधारित जातीतील कोंबडीपेक्षा तुलनेने लवकर वयात येतात.

- परसबागेतील मुक्तसंचार पद्धतीत कोंबडीचे वजन सहा आठवड्यात ५०० ते ५५० ग्रॅम होते.

- मुक्तसंचार पद्धतीत लैंगिक परिपक्वतेचे वय १७० ते १७५ तर बंदिस्त पद्धतीत १६५ ते १७० दिवस आहे.

- कोंबडीचे मुक्तसंचार पद्धतीत ४० आठवडे वयापर्यंत ५५ ते ६० अंडी आणि वार्षिक १४०-१५० अंडी उत्पादन.

- बंदिस्त पद्धतीत कोंबड्या ४० आठवडे वयापर्यंत ९० आणि वार्षिक २२८ इतके अंडी उत्पादन देतात.

- आकर्षक बहू-रंगी पिसारा, भक्षकांपासून दूर पळण्यासाठी लांब पायांचा वापर,उच्च रोगप्रतिकारक क्षमता.

Poultry Farming
Indigenous Cow Project : देशी गोवंश प्रकल्पामुळे नव्या युगास प्रारंभ

सुधारित जातीच्या संगोपनाचे फायदे

- परसबागेत कमी प्रारंभिक भांडवली गुंतवणुकीसह अगदी लहान स्वरूपात सुरवात करता येते.

- कृषी उप-उत्पादने आणि स्वयंपाकघरातील कचरा इत्यादींच्या वापरामुळे खाद्यावरील खर्च अत्यल्प.

- परसातील कोंबड्या तसेच अंड्यांची स्थानिक बाजारपेठेत चढ्या दराने विक्री.

- उच्च रोगप्रतिकारक क्षमता, हवामानाच्या परिस्थितीशी उत्तम जुळवून घेण्याची क्षमता. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरण्याची क्षमता. पूरक उत्पन्नाचा स्रोत.

- शेतीची कामे करण्यास सक्षम नसलेल्या कुटुंबाचे या व्यवसायातून अर्थार्जन.

- ग्रामीण समुदायांना अतिरिक्त उत्पन्न.

- कमी गुंतवणुकीत अंडी आणि मांस उत्पादन.

- संपर्क - डॉ. कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२ (सहायक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, पशू पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

- डॉ. आर. सी. कुलकर्णी ७७७६८७१८०० (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com