Indigenous Cow Project : देशी गोवंश प्रकल्पामुळे नव्या युगास प्रारंभ

शेणापासून पेंट तयार करण्यावर आता भर द्यायला हवा, तो ऑइलपेंटपेक्षा दर्जेदार असून, स्वस्तही आहे, त्यामुळे आता या प्रकल्पातून पेंट, खत व गॅस तयार करणे गरजेचे आहे.
Minister Nitin Gadkari
Minister Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Indigenous Cow Project : येथे सुरू झालेल्या देशी गोवंश सुधारणा प्रकल्पामुळे दुधाच्या क्षेत्रात (Dairy Industry) नव्या युगाची सुरुवात झाली आहे, राज्यालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक असा हा प्रकल्प ठरेल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इंप्रूव्हमेंट - पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र) सोबतच एम्ब्रियो ट्रान्स्फर (IVF) लॅबोरेटरी याचे उद्‍घाटन शनिवारी (ता. ११) मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

Minister Nitin Gadkari
Nitin Gadkari : राजू शेट्टींची आई जेव्हा गडकरींच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवते

ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, आमदार रोहित पवार, चेअरमन राजेंद्र पवार, विश्‍वस्त सुनंदा पवार, रणजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, डॉ. रजनी इंदुलकर, प्रशांतकुमार पाटील व शरद गडाख यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Minister Nitin Gadkari
Agriculture Export : शेतीमालाची निर्यात जलदगतीने करणार : गडकरी

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, ‘‘शेणापासून पेंट तयार करण्यावर आता भर द्यायला हवा, तो ऑइलपेंटपेक्षा दर्जेदार असून, स्वस्तही आहे, त्यामुळे आता या प्रकल्पातून पेंट, खत व गॅस तयार करणे गरजेचे आहे. आपल्याकडे मिल्क पावडरचा दर जास्त असल्याने समस्या आहे.

माझा मुलगा न्यूझीलंड ऑस्ट्रेलियातून ही पावडर विकत घेऊन निर्यात करतो. भारतीय किंमत परवडत नाही, त्यामुळे आता या बाबतही उत्पादन वाढविल्यानंतर संशोधन करून दूध व मिल्क पावडरचे काय करायचे याचाही निर्णय घ्यावा लागेल.’’

‘‘माझ्या साखर कारखान्यात दहा वर्षांत ३०० कोटी रुपये गमावले, यंदा आम्ही साखर न करता इथेनॉलचे केले, आम्ही आता शुगर डिटर्जंट, हँडवॉश, फेसवॉश, हेअरवॉश तयार करतो आणि जगात सात देशात आम्ही निर्यात करतो.

साखरेऐवजी डिटर्जंट केल्याने आम्हाला फायदा होत आहे,’’ अशी माहिती देत मंत्री श्री. गडकरी पुढे म्हणाले, की मी पवारसाहेबांना विनंती केली आहे की वसंतदादा शुगर इन्स्टियूट मध्ये आता साखरेपासून ग्रीन हायड्रोजन निर्मितीसह, एनर्जी क्रॉप्स व बायोएनर्जी फ्रॉम शुगर केन असा एक प्रकल्प सुरू करण्याची गरज आहे.

मी माझा ट्रॅक्टर सीएनजीवर चालवितो, लाखभर रुपये वार्षिक वाचतात. आपण सोळा लाख कोटी रुपयांची गॅसची आयात करतो. तंत्रज्ञान उपलब्ध आहे, सीएनजी एलएनजी सारखे उत्पादन आता शेतकऱ्यांनी करावे, अन्नदाता सुखी होणे गरजेचे आहे. शेतकरी उर्जादाता झाला, तर देशाचे चित्र बदलून जाईल. रणजित पवार यांनी प्रास्ताविक केले.

Minister Nitin Gadkari
कृषी क्षेत्राला ऊर्जा क्षेत्राकडे परावर्तित करण्याची गरज : गडकरी

प्रकल्प राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल : पवार

‘‘या प्रकल्पामुळे पुढील दोन वर्षांत दुधाची अर्थव्यवस्था बदलेल. गीर गाय ब्राझीलमध्ये प्रतिदिन ६० लिटर दूध देते, आपल्याकडे तसेच व्हावे असा प्रयत्न आहे. प्रजनन, सुधारित पोषण, प्रशिक्षण व जागरूकता निर्माण करण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे.

दुधाबाबत शिक्षण देणे व शिकविणे याचे हा प्रकल्प व्यासपीठ आहे. केवळ बारामतीपुरते नाही, तर राज्यासाठी हा प्रकल्प मार्गदर्शक ठरेल. वाण सुधारणा देखील यातून होईल, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com