Water Conservation : बंदिस्त वाफे तयार करणारं यंत्र वापरा ; कोरडवाहू जमीन पाणीदार बनवा

Dry Land Management : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कृषी अवजारे आणि यंत्रे संशोधन प्रकल्पामध्ये ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे बनविणारे अवजार विकसित केले आहे. या यंत्राने ६ मीटर लांबी व २ मीटर रुंदी असलेले बंदिस्त वाफे तयार करता येतात.
Water Conservation
Water Conservation Agrowon
Published on
Updated on

Soil And Water Conservation : कोरडवाहू शेती ही नेहमी एकूण पडणाऱ्या पावसावर अवलंबून नसून ती पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी जमिनीत मुरणाऱ्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाचे पाणी वाचविण्याचा सर्वांत कार्यक्षम आणि स्वस्त मार्ग जमिनीत मूलस्थानी जलसंधारणद्वारे मुरवून पाणी ठेवणे. माती आणि जलसंधारणाच्या प्रभावी पद्धतींपैकी एक म्हणजे शेतात बंदिस्त वाफे तयार करणे. उताराला आडवे वाफे व उभे वाफे समांतर अंतराने जोडून बंदिस्त वाफे तयार करता येतात. हे वाफे तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात मजुरांची गरज असते. हे काम जास्त कष्टाचे असल्यामुळे मजुरीमुळे खर्च वाढतो.अशा परिस्थितीत बंदिस्त वाफे जर यंत्राने केले तर कमी खर्चात जास्त चांगल्या प्रकारे हे काम होते.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कृषी अवजारे आणि यंत्रे संशोधन प्रकल्पामध्ये ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे बनविणारे अवजार विकसित केले आहे. या यंत्राने ६ मीटर लांबी व २ मीटर रुंदी असलेले बंदिस्त वाफे तयार करता येतात. वाफ्याच्या वरंब्याची उंची साधारणपणे २० ते २२ सेंटीमीचर राहते. यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी मुरवणे किंवा वाहून जाणारे पाणी अडवणे शक्य होते.

Water Conservation
Water Conservation : कोरडवाहू क्षेत्रामध्ये मूलस्थानी जलसंधारण

यंत्राचे फायदे

जमिनीमध्ये ५० टक्के जास्त ओल साठवली जाते.

पाण्याची आणि मातीची धूप रोखते, आर्द्रता वाचते आणि पिकाचे उत्पादन वाढते.

या यंत्राच्या फार्मर्स फर्स्ट प्रकल्प, कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, राहुरी; कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, सोलापूर प्रक्षेत्रावर चाचण्या घेण्यात आल्या. या यंत्राची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता खूप चांगली आहे. त्यात रब्बी ज्वारीसाठी जमिनीत परतीच्या पावसाचे पाणी मुरविण्यासाठी बंदिस्त वाफे तयार केल्यामुळे रब्बी ज्वारीचे उत्पादन २ ते ३ क्विंटल पर्यंत वाढल्याचे आढळले.

वैशिष्ट्ये

हे यंत्र ३५ अश्‍वशक्ती किंवा त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

या यंत्राने एका दिवसात ४ ते ४.५ हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करणे शक्य आहे.

यंत्राच्या वापरामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ३० ते ४० टक्के बचत होते.

पावसावर अवलंबून असणाऱ्या म्हणजेच कोरडवाहू पिकांसाठी हे यंत्र जास्त फायदेशीर ठरते. उदा. ज्वारी, बाजरी, मका, डाळी आणि तेल बियाणे, काही नगदी पिके उदा. कापूस, एरंडेल आणि भुईमूग इ. परिणामी पिकांचे उत्पादन वाढते.

-----

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com