नगर ः राज्यात यंदा बागायती ज्वारीचे (Horticultural sorghum this year) हेक्टरी साधारणपणे १० क्विंटल तर जिरायती ज्वारीचे साडेसहा क्विंटलच्या जवळपास उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. कृषी विभागातून (Agriculture Department) आतापर्यंत झालेल्या सत्तर टक्के पीक कापणी प्रयोगातून हे स्पष्ट झाले आहे. उत्पादनाच्या या आकडेवारीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा ज्वारीचे जिरायती आणि बागायती क्षेत्राचा विचार करता साडेअकरा ते बारा लाख टन उत्पादन शक्य आहे, असा अंदाज आहे.
गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर यंदा ज्वारीच्या (Sorghum) क्षेत्रात घट झाल्याने यंदा उत्पादनातही घट अपेक्षित आहे. त्यातील हंगामातील प्रमुख पीक (Crop) असलेल्या ज्वारी लागवडीच्या क्षेत्रात वीस वर्षांच्या तुलनेत यंदाचे पेरणी क्षेत्र पाहता सुमारे साठ टक्के घट झाली आहे. राज्यात २००० मध्ये रब्बीत ज्वारीची ३१ लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा केवळ १२ लाख ४४ हजार हेक्टरवर पेरणी झालीय. घटत्या क्षेत्राचा चारा उत्पादनासह अन्नधान्य उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.
राज्यात रब्बीत ज्वारीचे प्रमुख पीक आहे. साधारणपणे नगर, सोलापूर, लातूर, बीड, 9Nagar, Solapur, Latur, Beed,) उस्मानाबादसह विदर्भातील काही जिल्ह्यांत ज्वारी घेतली जाते. ज्वारीचे उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी (Agriculture University) नवीन वाण विकसित केलेले असले, तरी सर्वाधिक मागणी असलेल्या मालदांडी या प्रमुख वाणांचाच बहुतांश शेतकरी पेरणीला (Sowing) वापर करत असल्याचे सातत्याने स्पष्ट झाले आहे.
राज्यात ज्वारीचे २० लाख २७ हजार २५८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात यंदा क्षेत्रात घट झाली. गेल्यावर्षी हे क्षेत्र १६ लाख ६० हजार होते. यंदा १४ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यात साधारणपणे ८ लाख हेक्टर हे जिरायती असून ६ लाख हेक्टर क्षेत्र बागायती आहे. दरवर्षी रब्बीत ज्वारीची हेक्टरी उत्पादकता ५ ते १० क्विंटल असते. अलीकडच्या सात ते आठ वर्षांत ती १० ते ११ क्विंटलच्या जवळपास गेली. खरिपातही हेक्टरी ११ ते १६ क्विंटलच्या जवळपास असते. दरवर्षी ज्वारीचे साधारण पंधरा ते २२ लाख टनांपर्यंत उत्पादन होते.
यंदा कृषी विभागाने आतापर्यंत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पीक कापणी प्रयोग केले आहेत. त्यातून बागायती ज्वारीचे साडेदहा क्विंटल तर जिरायती ज्वारीचे साडेसहा क्विंटलपर्यंत उत्पादन निघाले आहे. आता त्यात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. जिरायती व बागायती क्षेत्रानुसार यंदा ज्वारीचे साडेअकरा ते बारा लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कडबा होणारा दुरापास्त
राज्यात ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यात कडब्याचा चाराही महत्त्वाचा मानला जातो. साधारण एक हेक्टर क्षेत्रापासून सरासरी ८ टन कडब्याचा चारा मिळतो. पशुसंवर्धन विभाग त्याची नोंद कडबा म्हणून नव्हे तर चारा म्हणून करते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कडब्याचे उत्पादनही कमी होणार हे स्पष्ट झाले आहे. पुढील काळातही कडबा भाव खाऊन जाणार असून बाजारात कडबा मिळणेच दुरापास्त होणार आहे.
ज्वारीने खाल्ली उचल
नगर येथील बाजार समितीत ज्वारीची नगर जिल्ह्यासह मराठवाडा, सोलापूर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागातून आवक होत असते. अजून फारशी आवक नाही. मागील काही दिवस ज्वारीचे दर दोन हजाराच्या आत होते. आता महिनाभरापासून दराने उचल खाल्ली असून ठोक बाजारात साडेतीन हजार तर किरकोळ बाजारात प्रतिक्विंटल चार हजारांच्या पुढे दर गेल्याचे दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.