Nashik Agriculture News : कार्डिअन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन, नाशिक आणि सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. १८) सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० या वेळेत सटाणा तालुक्यातील ताहराबाद येथे पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन (Fish Farming) संधी, शेतकऱ्यांना जोड धंदा, व्यवहार्यता याविषयक एकदिवसीय मत्स्यपालन प्रशिक्षण शिबिराचे (Fisheries Training Camp) आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर सुगी फार्मर प्रोड्युसर कंपनी, ताहराबाद येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी नील क्रांतीचा एक भाग म्हणून पिंजरा मत्स्यपालन उपक्रमाअंतर्गत मोफत मत्स्यपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये मत्स्यशेती, मत्स्यपालन व मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती, मत्स्य चकली, मत्स्य खिमा, मत्स्य बटाटा, मत्स्य पॅटीस, मत्स्य कटलेट, मत्स्य पापड याबाबत माहिती देण्यात येणार असून यापैकी काही खाद्य पदार्थांची निर्मिती याबाबत मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, खारजमीन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर वैद्य मार्गदर्शन करणार आहेत.
या वेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे, नाशिक विभागाचे मत्स्यव्यवसाय विभाग उपायुक्त संजय वाटेगावकर, सहायक आयुक्त प्रणिती चांदे, नाबार्डचे डीडीएम अमोल लोहकरे, मत्स्य उद्योग भूषण पुरस्कार विजेते अशोक गायकर, बागलाणचे सामाजिक कार्यकर्ते आबा बच्छाव उपस्थित राहणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मत्स्यपालन करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी, फिश फार्मिंग शेतकरी उत्पादक कंपनी, धरण क्षेत्रात मत्स्यपालन करणाऱ्या मत्स्य संस्था, शेततळे मालक शेतकरी, पेसा तलाव ठेकाधारक, आदिवासी सहकारी संस्था, आत्मा शेतकरी गट यांच्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असून, असे कार्डिअन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने अनिकेत सोनवणे, रवींद्र अमृतकर, स्वप्नील चौधरी, नितीन गायकर यांनी सांगितले. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी या ८४१२९९५४५४ क्रमांकावर संपर्क साधावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.