Papaya Orchard Management : कडक उन्हात पपई बागेत करायचे उपाय

Papaya Orchard : पपई पिकाला सरासरी २२ ते २६ अंश सेल्सिअस तापमान मानवत. पण सध्या तापमानाचा पारा ४० च्या वर गेलाय त्यामुळे पपई ची पानं करपण, फळावर चट्टे पडण, फळातील गर खराब होऊन फळे पिवळी पडून गळतात.
Papaya Orchard Management
Papaya Orchard ManagementAgrowon
Published on
Updated on

Papaya Care : पपई पिकाला सरासरी २२ ते २६ अंश सेल्सिअस तापमान मानवत. पण सध्या तापमानाचा पारा ४० च्या वर गेलाय त्यामुळे पपई ची पानं करपण, फळावर चट्टे पडण, फळातील गर खराब होऊन फळे पिवळी पडून गळतात.

पपई झाडाची मुळे मांसल असल्यामुळे जमिनीतील तापमानामुळे उष्णतेचा परिणाम मुळांवर होतो. त्यामुळे मुळे खराब होतात. मुळांच अन्नद्रव्य आणि पाणी शोषण करण्याचे कार्य मंदावत.फळांचा आकार लहान राहतो आणि फळाच्या गरामध्ये साका तयार होतो. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.

वाढलेल्या तापमानामुळे पपई झाडावर पांढरी माशी, तुडतुडे या रसशोषक किडी आणि काही विषाणूजन्य रोगही पडतात. त्यामुळे पानांचा रंग हिरवट पिवळसर होतो. पानांवर सुरकुत्या पडतात. जास्त प्रादुर्भावामध्ये फळावर पिवळे चट्टे पडतात. त्यामुळे फळांची प्रत खालावते.

Papaya Orchard Management
Banana Summer Care : उन्हामुळे होरपळणाऱ्या केळी बागेत करायचे उपाय

आता पाहुया या समस्यांवर उपाय काय करायचे

बागेला ठिबक सिंचनाद्वारे शक्यतो रात्रीच्या वेळी पाणी द्यावे. झाडाच्या खोडाच्या चारही बाजूंनी उसाचे पाचट, वाळलेले गवत, गव्हाचा भुस्सा, पालापाचोळा, लाकडी भुस्सा यांच आच्छादन कराव.आच्छादनाचा थर साधारण ३ ते ४ इंच इतका खोडाच्या चारही बाजूंनी करावा. बागेत ६० ते १०० मायक्रॉन जाडीच काळ्या रंगाच प्लॅस्टिक आच्छादन कराव. झाडावर ५ ते ८ टक्के तीव्रतेच्या बाष्परोधकाची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण केल्यासही बागेच उन्हापासून संरक्षण होतं. नवीन लागवड केलेल्या झाडांना गोणपाट किंवा जुन्या साड्या लावून सावली करावी.सायंकाळच्या वेळी संपूर्ण झाडावर एक दिवसाआड पाण्याचा फवारा पंपाने करावे. पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानांवर १ ते १.५ टक्के पोटॅशिअम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी. अशा प्रकारचे साधे उपाय करुन पपई बाग कडक उन्हापासून वाचवता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com