Banana Summer Care : उन्हामुळे होरपळणाऱ्या केळी बागेत करायचे उपाय

Team Agrowon

सूर्यप्रकाश, पानांचे घर्षण व धुलीकण यामुळे घडांच्या बाह्य गुणवत्तेवर परिणाम होतो. घडांची गुणवत्ता खालावते. त्यासाठी घडावर पाॅलिथिन पिशवीचे आवरण घालावे.

Banana Summer Care | Agrowon

बागेभोवती शेवरीचे सजीव कुंपण केलेले नसल्यास, शेडनेट लावून घ्यावे. शेडनेट लावताना त्यांची उंची बागेतील झाडांच्या उंचीपेक्षा थोडी जास्त असावी.

Banana Summer Care | Agrowon

उन्हाळी हंगामात घडांच्या वजनामुळे केळीची झाड वाकतात. तसेच जोराच्या वाऱ्यांमुळे झाड खोडामध्ये मोडून नुकसान होते. यासाठी झाडांना आधार म्हणून बांबूच्या काठीच्या किंवा पाॅलिप्राॅपिलीन पट्ट्यांचा आधार द्यावा.

Banana Summer Care | Agrowon

जून- जुलै लागवडीच्या बागेला १८ ते २० लिटर, ऑक्टोबर लागवडीस ९ ते ११ लिटर तर फेब्रुवारी- मार्च महिन्यातील लागवडीच्या बागेस ४.५ ते ६.५ लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन या प्रमाणे द्यावे.

Banana Summer Care | Agrowon

बागेत उसाचे पाचट, गव्हाचे काड, हरभऱ्याचा भुस्सा वापरून आच्छादान करावे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लागवड केलेली बागेतील रोपे सध्या स्थिरावून शाकीय वाढीच्या अवस्थेत आहेत.

Banana Summer Care | Agrowon

अशा लहान रोपांचे उन्हापासून संरक्षन करण्यासाठी बागेभोवती दोन ओळींत ताग लावून घ्यावा. शक्य झाल्यास प्रत्येक झाडास क्राॅप कव्हर लावून सावली करावी.

Banana Summer Care | Agrowon

फेब्रुवारी- मार्च मध्ये लागवड केलेल्या बागेस जमिनीतून खते देताना फक्त ८२ ग्रॅम युरिया द्यावा.

Banana Summer Care | Agrowon