स्वयंसहाय्यता बचत गट आणि व्यवसाय : सकसता विश्लेषण

सकसता विश्लेषण म्हणजे स्वॉट अॅॅनालेसिस (Strengths, Weaknesses, Opportunities, Threats) या इंग्रजी शब्दाकरिता प्रथमच तयार करण्यात आलेला पर्यायी मराठी शब्द आहे.
SWOT Analysis
SWOT AnalysisAgrowon
Published on
Updated on

डॉ. महेंद्र भैरमकर

सकसता विश्लेषण म्हणजे सक्षमता, कमकुवतपणा, संधी आणि तापदायकता या सर्वांचे विश्लेषण करणे होय. सक्षमता आणि कमकुवतपणा हे अंतर्गत गुणधर्म असून संधी आणि तापदायकता हे बाह्य गुणधर्म असतात.

स्वयंसहाय्यता बचत गट सकसता विश्लेषण (SWOT analysis of SHG)

स्वयंसहाय्यता बचत गट व्यवसायाचे सकसता विश्लेषण करण्यापूर्वी स्वयंसहाय्यता बचत गटाचे सकसता विशलेषण करणे महत्वाचे आहे. यामध्ये बचत गट कशा प्रकारे चालू आहे?, बचत गटामध्ये कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे?, बचत गटाच्या उणिवा काय आहेत? बचत गटाकरिता कोणत्या संधी आहेत ? इत्यादी बाबींचे परीक्षण करण्यासाठी बचत गटाचे सकसता विश्लेषण करणे गरजेचे आहे

स-सक्षमता / सामर्थ्य / शक्ती

- बचत गटातील सदस्यांना जबाबदारीची जाणीव असणे.
- बचत गटातील सदस्यांचा एकमेकांशी चांगला संपर्क असणे.
- बचत गटातील सदस्यांमध्ये अनुभवाची शिदोरी असणे.
- बचत गटातील सदस्यांमध्ये संपूर्ण कौशल्य असणे.
- बचत गटातील सदस्यांची मोठ्या प्रमाणात ओळख असणे.
- बचत गटातील सदस्यांचा शैक्षणिक दर्जा अतिशय उत्कृष्ट असणे

SWOT Analysis
गाभण गाय का आटवितात ?

क- कमकुवतपणा/ कमजोर /दोष

- बचत गटातील सदस्यांची मासिक बैठकीतील गैरहजेरी.
- बचत गटातील सदस्यांना त्याच्या गटाबद्दलच्या माहितीचा अभाव
- बचत गटातील सदस्यांमध्ये कमी परस्पर सहकार्य.
- बचत गटातील सदस्यामध्ये संपर्क कौशल्याचा अभाव.
- बचत गटातील ठरावीक सदस्यच जास्त मेहनत करतात.

SWOT Analysis
पांढरे तोंड असलेली म्हैस तुम्ही पाहिलीय का?

स- संधी / वाव/ आशा

- बचत गट एकसंघ राहण्याकरिता सदस्यांमध्ये विविध कौशल्य गुण विकसित करणे.
- बचत गट व्यवस्थापन करण्याकरिता सदस्याचे अनुकूल व्यक्तिमत्व घडविणे.
- बचत गट सदस्यांना नवीन अनुभव मिळविण्याकरिता प्रोत्साहन देणे.

ता- तापदायकता / धोका / भिती

- बचत गटातील सदस्यांची धरसोड वृत्ती
- बचत गटातील सदस्यांचा कामचुकारपणा
- बचत गटातील कल्पकतेवर एकमत न होणे
- बचत गटातील सदस्यांमध्ये अंतर्गत कुरबुरी, गैरसमज, राजकारण
- बचत गटातील सदस्यांची पैसा उधळण्याची वृत्ती

स्वयंसहाय्यता बचत गट व्यवसाय: सकसता विश्लेषण

स्वयंसहाय्यता बचत गट व्यवसाय कसा चालू आहे. व्यवसायात कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे. व्यवसायात कोणत्या संधी आहेत आणि व्यवसायाचा विस्तार कशाप्रकारे करता येईल, या सर्व बाबींचे परीक्षण करण्यासाठी बचत गटाच्या व्यवसायाचे सकसता विश्लेषण करणे गरजेचे आहे.

स- सक्षमता/ सामर्थ्य / शक्ती

समव्यवसायिक दुसऱ्या बचत गटांपेक्षा आपला गट किती सामर्थ्यवान आहे?, समव्यवसायिक प्रतिस्पर्धी त्यांच्या व्यवसायात ज्या सोयी सुविधा देतात त्यांच्यापेक्षा जास्त गुणात्मक व चांगल्या सोयी सुविधा आपला बचत गट कशा प्रकारे देवू शकतो?, हा विचार रोजच्या रोज करणे महत्वाचे आहे.

क- कमकुवतपणा/ कमजोर / दोष

तुलनात्मकदृष्ट्या बचत गट व्यवसायाच्या काय त्रुटी आहेत, त्यावर मात करुन बचत गट व्यवसाय कसा यशस्वी होईल, बचत गटाचे स्वतःचे दोष काय आहेत व त्यावर बचत गट कसा उपाय करु शकतो? , या सर्वांचा विचार बचत गटातील सदस्यांनी करणे महत्वाचे आहे.

स- संधी/ वाव/ आशा

बचत गटाच्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीने कोणत्या क्षेत्रामध्ये विभागामध्ये वाव /संधी मिळेल. त्यासाठी बचत गटातील सदस्यांमध्ये काहीतरी वेगळे करण्याची धमक आहे का?, नाविन्यतेवर भर देऊन स्वतःच्या उत्पादनावर वेगळा ठसा कसा उमटवू शकेल, हे ठरविता आले पाहिजे.

ता- तापदायकता / धोका / भिती

बचत गटाचा व्यवसाय वाढविताना किंवा पुढे जाताना कोणते धोके येऊ शकतात, ते टाळून पुढे कसे जाता येईल, संकटावर कोणत्या पध्दतीने वचत गट सदस्य मात करु शकतात याचा विचार करावा.
अशाप्रकारे सकसता विश्लेषणाचा उपयोग भविष्यातील बचत गटाचे आणि व्यवसायाचे नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी करावा. गटातील आणि व्यवसायातील कमकुवत बाजू दूर करुन उपलब्ध संधी व बलस्थाने यांचा जास्तीत जास्त वापर होईल, असे धोरण अवलंबवावे.

( लेखक डॉ. महेंद्र भैरमकर, निवृत्त, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, विस्तार शिक्षण, कृषी महाविद्यालय, दापोली ४१५७१२ जि.रत्नागिरी.)

डॉ. महेंद्र भैरमकर

मो. नं. ९४२१७८०५०९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com