Stylo Grass Cultivation : कमी पाण्यातही येणारे स्टायलो गवत

Grass Cultivation : ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी स्टायलो गवताची आंतरपीक म्हणून लागवड करावी.
Stylo Grass Cultivation
Stylo Grass CultivationAgrowon
Published on
Updated on

Stylo Grass : ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी  स्टायलो  गवताची (Stylo Grass) आंतरपीक (Intercropping) म्हणून लागवड करावी. यामुळे जनावरांना पौष्टिक चारा मिळण्यास मदत होईल. स्टायलो गवत द्विदलवर्गीय असून बहुवार्षिक आहे.

स्टायलो गवत सरळ वाढते. तसेच  यास जास्त फुटवे येतात.स्टायलो गवत लागवडीसाठी स्टायलोसन्थेस हमाटा, स्टायलोसन्थेस स्कब्रा या दोन जातींची लागवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले क्रांती ही जात प्रसारित केली आहे.

स्टायलो गवत द्विदल वर्गीय असून बहुवार्षिक आहे. 

गवत सरळ वाढणारे असून यास जास्त फुटवे येतात. 

ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, अशा ठिकाणी या गवताची लागवड करावी. 

या गवताला जमीन ही माळरान, पडीक मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी लागते.

गवतामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे १२ ते १५ टक्के, कॅल्शिअमचे प्रमाण  ०.७० ते १.९० टक्के आणि फॉस्फरसचे प्रमाण ०.१० ते ०.१५ टक्के असते.  

Stylo Grass Cultivation
Grass Cultivation : गावनिहाय गवत लागवडीवर विचार व्हावा

लागवड तंत्र

लागवडीसाठी चालू वर्षातील बियाणे पेरणीसाठी वापरावे. प्रती हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे लागते. बीज प्रक्रिया करत असताना बियाणे गरम पाण्यात ३ ते ४ मिनिटे भिजवून घ्यावे. लागवड ३० x १५ सेंमी अंतरावर करावी.  

बियाणे जास्त खोलीवर टाकू नये, कारण त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होतो. लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत मिसळावे. तसेच प्रति हेक्टरी २० किलो नत्र व ३० किलो स्फुरद द्यावे. पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.  

उत्पादन 

पेरणी केल्यापासून ३ ते ४ महिन्यांनी जमिनीपासून १० ते १५ सेंमी उंचीवर कापणी करावी.

कोरडवाहू क्षेत्रामध्ये हिरव्या चाऱ्याचे  १५ ते २० टन आणि बागायती क्षेत्रामध्ये ३०-३५ टन उत्पादन मिळते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com