Unseasonal rains Onion Karpa : पावसामुळे कांद्यावर मर, करपाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?

पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा पिकात कमी अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.
Onion Crop Management
Onion Crop ManagementAgrowon
Published on: 
Updated on: 

राज्याच्या विविध भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग (Orchards) व पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. याशिवाय रब्बी हंगामातील (Rabbi Season) कांदा पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा पिकात (Onion Crop) कमी अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.

पावसाच्या तिव्रतेनूसार नुकसानीची पातळी ५ ते १० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत आहे. ज्या ठिकाणी रब्बी कांद्याची वेळेवर लागवड झाली त्याठिकाणी मार्चच्या मध्यापर्यंत कांद्याची प्रतिएकरी उत्पादकता चांगली दिसत होती, पण पुढे अवकाळीनंतर उत्पादकता कमी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा कांदा रोपे तयार होण्यास उशीर लागला परिणामी जानेवारी महिन्यात लागवडी झाल्या. त्यानंतर अवकाळी पाऊस, वातावरणात सातत्याने होणारे बदल यामुळे मागील कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पात करपल्याने कांद्याच्या फुगवण क्षमतेवर परिणाम होतो. काही ठिकाणी वेळेवर लागवड झालेल्या कांद्याची काढणी झालेली आहे.

तर ज्या ठिकाणी उशीरा लागवड झालेली आहे असा कांदा वाढीच्या अवस्थेत असल्यामुळे वावरातच आहे. अशा परिस्थितीमध्ये कांदा पिकात नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी केव्हीके, नारायणगावचे पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी सांगीतलेल्या पुढील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात.

सुरुवातीला शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपायोजना कराव्यात. बेमौसमी पावसामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोग जसे की, काळा, तपकिरी आणि जांभळा करपा तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा पिकाचे योग्य नियोजन करणे पीक उत्पादनाच्या दृष्टीने गरजेचे आहे.

यामध्ये करपा रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी करताना आधी हवामानाचा अंदाज घ्यावा. कारण फवारणी केल्यानंचतर लगेच पाऊस पडला तर फवारणीचा खर्च वाया जाऊ शकतो.

कांदा पिकावरील काळा, तपकिरी आणि जांभळा करपा रोगाच्या नयंत्रणासाठी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (०.१ टक्के) १ ग्रॅम  प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.

याशिवाय क्लोरोथेरोनॉल (०.२५ टक्के) २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल (०.१ टक्के) किंवा हेक्झाकोनॅझोल १ मिली किंवा मेटीराम (५५ टक्के) अधिक पायरक्लोस्ट्रोबीन (५ टक्के डब्लूजी) १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. प्रति १० लिटर पाण्यासाठी ६ मिली स्टीकर मिसळून फवारणी कारावी.

त्यामुळे बुरशीनाशकापासून अधिक चांगले नियंत्रण मिळेल. एका शिवारात सर्व शेतकऱ्यांनी फवारणी एका ठराविक काळात केली तर रोगाचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते. 

Onion Crop Management
Soil Fertility : गाळमाती वापरताना कोणती काळजी घ्यावी?

मर रोगाच्या नियंत्रणासाठी वाफ्यात साचलेले पाणी काढून घ्यावे. वाफ्यामध्ये पाणी साचू देऊ नये.  ट्रायकोडर्मा व सुडोमोनास प्रत्येकी २ लिटर प्रति एकर जमिनीत ओल असताना आळवणी करावी.

कार्बेन्डाझिम (०.१ टक्के) १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

कांदा साठवणूकीसाठी कार्बेन्डाझिम (०.१ टक्के) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ३०, २०, १० दिवस कांदा काढण्याच्या आगोदर फवारणी करावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com