Pomegranate Production : काटेकोर नियोजनातून गुणवत्तापुर्ण डाळिंबाचे उत्पादन

Pomegranate Orchard : सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथे जोतीराम शिंदे यांची १६ एकर शेती आहे. त्यात २ एकर क्षेत्रावर डाळिंब तर उर्वरित क्षेत्रापैकी तीन एकरांत द्राक्ष आणि हंगामी पिकांची लागवड केली जाते. शिंदे मागील पाच वर्षांपासून डाळिंब शेती करत आहेत.
Pomegranate Production
Pomegranate ProductionAgrowon
Published on
Updated on

शेतकरी ः जोतीराम बबन शिंदे
गाव ः पडसाळी, ता. उत्तर सोलापूर, जि, सोलापूर
एकूण क्षेत्र ः १६ एकर
डाळिंब बाग ः २ एकर


Pomegranate Orchard Management : सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथे जोतीराम शिंदे यांची १६ एकर शेती आहे. त्यात २ एकर क्षेत्रावर डाळिंब (Pomegranate Orchard) तर उर्वरित क्षेत्रापैकी तीन एकरांत द्राक्ष आणि हंगामी पिकांची लागवड केली जाते. शिंदे मागील पाच वर्षांपासून डाळिंब शेती करत आहेत.

बागेत प्रामुख्याने हस्त बहरातील फळांचे उत्पादन घेतले जाते. मागील दोन वर्षांपूर्वी बागेतून पहिले उत्पादन घेतले, त्यावर्षी तुलनेने कमी उत्पादन मिळाले. गेल्या वर्षी बागेतून एकरी सरासरी ६ टन उत्पादन मिळाले. त्यास प्रति किलो ७० ते १३० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

डाळिंब बागेत फळांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष दिले जाते. यावर्षी उत्पादन मिळण्याचे तिसरे वर्ष आहे.
सध्या बागेत हस्त बहार (Hast bahar) धरला असून फळांची सेटिंग चांगली झाली आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत दिसून आला. त्यात जवळपास २० टक्के फळांचे नुकसान झाले आहे. त्यातून उर्वरित बागेची चांगली जोपासना केली आहे. मात्र, सध्याच्या ढगाळ आणि पावसाळी स्थितीचा बागेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बागेत आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांच्या फवारण्या आणि खतांचे काटेकोर नियोजनावर भर दिला आहे.

बहर नियोजन ः
- हस्त बहरासाठी बाग ताणावर सोडली होती. ताण कालावधीत बागेत एकरी ६ ट्रॉली प्रमाणे शेणखताची मात्रा दिली आहे. त्यानंतर रासायनिक खतांचे बेसल डोस दिला.
- फेब्रुवारी महिन्यात बाग चांगली फुटून आली आहे. बहार धरल्यानंतर प्रत्येकी २० ते २५ दिवसांनी शेण-गोमूत्र आणि गूळ यांच्या स्लरीचा वापर केला.


- ताण तोडल्यानंतर पहिल्या महिन्यात दर आठवड्याला ०ः१४ः४८ आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रत्येकी दोन किलो प्रति एकर प्रमाणे दिले.
- दुसऱ्या महिन्यात कळी बाहेर पडण्यास सुरवात झाली. त्यावेळी दर आठवड्याला १३ः४०ः१३ हे खत पाच किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये दोन किलो प्रमाणे आलटून-पालटून वापर केला.


- तिसऱ्या महिन्यात १३ः०ः४५ हे खत ५ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये २ किलो प्रति एकर प्रमाणे दिले.
- चौथ्या आणि पाचव्या महिन्यात ०ः६०ः२० हे खत ५ किलो प्रति एकर प्रमाणे ठिबकद्वारे दिले.

Pomegranate Production
Grapes Production: काटेकोर नियोजनातून साधला द्राक्ष हंगाम

सिंचन व्यवस्थापन ः
- संपूर्ण लागवडीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.
- बहार धरल्यानंतर पहिल्या महिन्यात ३ ते ४ दिवसाआड साधारण ५ तास ड्रीपद्वारे सिंचन केले. त्यानंतर बागेतील जमिनीत वाफसा पाहून सिंचनावर भर दिला आहे.

मागील १० दिवसांतील कामकाज ः
- मागील महिनाभरापासून बागेत फळांची चांगली सेटिंग झालेली आहे. प्रति झाड साधारण १५० ते २०० फळे लागलेली आहेत.
- बागेतील मुख्य खोडावरील व काडीवरील वॅाटरशूट काढून घेतले.
- त्यानंतर ०ः६०ः२० हे खत प्रतिएकरी पाच किलो प्रमाणे ड्रीपद्वारे सोडले. शिवाय सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतली आहे.
- पिनहोल बोरर आणि खोडकिडीच्या प्रतिबंधासाठी झाडाची खोडे धुऊन घेतली.

Pomegranate Production
Pomegranate Rate : आवक घटल्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत

आगामी नियोजन ः
- डाळिंब फळांच्या फुगवणीसाठी ०ः६०ः२० हे खत पाच किलो प्रमाणे आठवड्यातून एक वेळ ड्रीपद्वारे सोडले जाईल.
- त्यानंतर ०ः०ः५० पाच किलो प्रमाणे खताचा डोसही सुरु करणार आहे.
- सध्या फळांचा आकार चांगला वाढतो आहे. पुढील साधारण महिनाभरात फळे काढणीला येतील.
- पावसाळी वातावरण असल्याने वाफसा पाहून सिंचन केले जाईल.

-------------------
- जोतीराम शिंदे, ८०१०९८७०७५
(शब्दांकन- सुदर्शन सुतार)


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com