Anil Jadhao
नाशिक जिल्ह्यातील मथुरपाडे येथील प्रगतिशील शेतकरी दिपक पोपट शिंदे यांनी कोटेकोर नियोजन आणि व्यवस्थापनातून द्राक्ष बाग खुलवली आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने द्राक्ष बागेला मोठा फटका बसला होता. सततच्या पावसाने बागांमध्ये पाणी साचले होते.
ऑक्टोबर महिन्यात जवळपास १५ ते २० दिवस सतत पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षाचा अर्ली हंगाम धरणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी द्राक्ष बागेला प्लास्टीकचे आच्छादन केले.
त्यांनी वातावरणाचा अंदाज घेत बागेचे योग्य व्यवस्थापन केले. खतांचा व संजीवकांचा संतुलीत वापर करून द्राक्ष मण्यांच्या वाढीवर भर दिला.
त्यांच्या कष्टाचे आता चीज होत असून बाग चांगलीच बहरली आहे. द्राक्ष मण्यांचा आकार चांगला वाढला.
सध्या द्राक्ष काढणीसाठी पुरक वातावरण आहे. त्यामुळे त्यांनी द्राक्ष काढणीच्या कामाला सुरुवात केली आहे.