ऊस पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती

एक हेक्टर क्षेत्रातून ८ ते १० टन पाचट मिळते,त्यापासून ४ ते ५ टन सेंद्रिय खत मिळते. शेणखत, कंपोस्ट खताच्या बरोबरीने ऊस पाचट हा सेंद्रिय खतासाठी चांगला पर्याय आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

सर्वसाधारणपणे एक हेक्टर शेतातून ७.५ ते १० टन पाचट (Sugarcane strips) उपलब्ध होते. त्यापासून ४ ते ५ टन सेंद्रिय खत (organic Fertilizer) मिळते. पाचटामध्ये ०.४o ते ०.५० टक्के नत्र, ०.१५ ते ०.२० टक्के स्फुरद आणि o.९ ते १ टक्के पालाश तसेच ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब ()Organic Carbon Soil असते. असे पाचट जाळल्यामुळे त्यातील सेंद्रिय कर्बाचा पुर्णत: नाश होतो. पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्क्यांहून अधिक भाग जळून जातो, केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते.

पाचटाचे फायदे ः

१. पाचटाद्वारे हेक्टरी ४ ते ५ टन सेंद्रिय खत मिळते.

२. पाचट आच्छादन म्हणून काम करते, त्यामुळे पाण्याची बचत होते. तणाची वाढ होत नाही.

३. हिरवळीचे खत किंवा शेणखतासाठी लागणाऱ्या खर्चात बचत होते.

पाचट कुजविण्याच्या पद्धती ः

शेताच्या बाहेर पाचटाचे सेंद्रिय खत निर्मिती ः

१) एक टन पाचटासाठी २ मीटर रुंद व १ मीटर खोल आणि ५ ते ६ मीटर लांबीचा खडुा करावा. शक्य झाल्यास त्या पाचटाचे लहान तुकडे करावे. त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते.

२) पाचटाचा सुरवातीला २० ते ३० सें.मी. जाडीचा थर देऊन या थरावर एक टन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० लिटर पाणी शिंपडावे. त्यानंतर १ किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणू संवर्धनाचे मिश्रण असलेले शेणाचे द्रावण समप्रमाणात पाचटावर टाकावे. आवश्यकता वाटल्यास जास्त पाणी शिंपडावे.

३) रासायनिक खतांचे द्रावण व जिवाणू संवर्धनाच्या द्रावणाचे एकत्रित मिश्रण न वापरता स्वतंत्रपणे वापरावे. अशारीतीने पाचटाचे वरचा भाग शेणमातीने झाकून घ्यावा.

४) एक ते दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्याची चाळणी करावी. आवश्यकतेनुसार खडुयामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी पाणी शिंपडावे. साधारणत: ६० टक्के ओलावा राहील या बेताने पाण्याचा वापर करावा.

५) चार ते साडेचार महिन्यात पाचटापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते.

पाचट कुजविण्याच्या पद्धती ः

शेताच्या बाहेर पाचटाचे सेंद्रिय खत निर्मिती ः

१) एक टन पाचटासाठी २ मीटर रुंद व १ मीटर खोल आणि ५ ते ६ मीटर

लांबीचा खडुा करावा. शक्य झाल्यास त्या पाचटाचे लहान तुकडे करावे.

त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते.

२) पाचटाचा सुरवातीला २० ते ३० सें.मी. जाडीचा थर देऊन या थरावर एक

टन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १००

लिटर पाणी शिंपडावे. त्यानंतर १ किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणू

संवर्धनाचे मिश्रण असलेले शेणाचे द्रावण समप्रमाणात पाचटावर टाकावे.

आवश्यकता वाटल्यास जास्त पाणी शिंपडावे.

३) रासायनिक खतांचे द्रावण व जिवाणू संवर्धनाच्या द्रावणाचे एकत्रित

मिश्रण न वापरता स्वतंत्रपणे वापरावे. अशारीतीने पाचटाचे वरचा भाग

शेणमातीने झाकून घ्यावा.

४) एक ते दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्याची चाळणी करावी.

आवश्यकतेनुसार खडुयामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी पाणी शिंपडावे.

साधारणत: ६० टक्के ओलावा राहील या बेताने पाण्याचा वापर करावा.

५) चार ते साडेचार महिन्यात पाचटापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार

होते.

लागवड केलेल्या उसामध्ये पाचटाचे सेंद्रिय खत ः

१) उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचा खोडवा घ्यावयाचा नसेल तर राहिलेले

पाचट गोळा करून ते नवीन लागवड करावयाच्या प्रत्येक सरीमध्ये पाचट

दाबून घ्यावे. त्यावर साधारणतः १ टन पाचटासाठी म्हणजे १० गुंठे क्षेत्रासाठी

८ किलो युरिया आणि १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट १०० लिटर पाण्यामध्ये

द्रावण करून पाचटावर शिंपडावे. त्यानंतर १oo लिटर पाणी, १oo किलो शेण,

तसेच १ किलो कंपोस्ट जिवाणू संवर्धन असलेले शेणाचे द्रावण त्यावर

शिंपडावे.

२) रिजरच्या साहाय्याने सरीचा वरंबा व वरंब्याची सरी करून सर्व पाचट

झाकून घ्यावे. नंतर तयार झालेल्या सरीमध्ये नेहमीच्या व प्रचलित पद्धतीने

लागणीच्या उसाची रासायनिक खतमात्रा देऊन लागवड करावी. चार ते

साडेचार महिन्यामध्ये झाकलेल्या सरीमधील पाचट कुजून शेतातच सेंद्रिय

खत तयार होते.

खोडव्यामध्ये पाचटाचे सेंद्रिय खत ः

१) लागवडीचा ऊस तुटून गेल्यावर खोडवा पिकामध्ये वरंब्यातील बुडके

हाताने मोकळे करून सरीमध्ये पाचट दाबून घ्यावे. त्यामुळे बुडख्यावर

सूर्यप्रकाश पडून नवीन कोंब जोमदार येतील. त्यानंतर बुडखे धारदार

कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत व त्यावर लगेच o.१ टक्के

कार्बेन्डाझिमची फवारणी करावी.

२) शेतात पसरलेल्या पाचटावर प्रती १० गुंठे क्षेत्रावर अंदाजे १ टन पाचट

असते. या प्रती १ टन पाचटासाठी ८ किलो युरिया १० किलो सिंगल सुपर

फॉस्फेट समप्रमाणात पाचटावर टाकावे. त्यानंतर १ किलो पाचट कुजविणारे

जिवाणू संवर्धन यांचे शेणामध्ये द्रावण करावे. हे द्रावण पाचटावर समप्रमाणात

शिंपडावे. खोडव्याला पहिले पाणी द्यावे.

३) ऊस तुटून गेल्यावर पहिल्या १५ दिवसात ही क्रिया करावी. त्यानंतर ३ ते

४ दिवसात वापसा आल्यावर पहारीसारख्या साधनाने रासायनिक खतांची

पहिली मात्रा द्यावी. दुसरी खत मात्रा सरीच्या विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने

१३५ दिवसांनी द्यावी. नेहमीप्रमाणे पाणी द्यावे. अशाप्रकारे खोडव्यामध्ये

पाचटाचे नियोजन केल्यास सुरवातीच्या काळात सरीमध्ये आच्छादन

म्हणून उपयोग होतो. त्यामुळे जमिनीतील ओलाव्याचे कमी होतो. साडेचार

ते पाच महिन्यानंतर सर्व पाचट कुजून खोडव्यामध्ये उत्तम सेंद्रिय खत तयार

होते.

(लेखिका मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,डॉ.उल्हास पाटील कृषी

महाविद्यालय,जळगाव येथे कार्यरत आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com