Food Processing : ज्वारीची बिस्किटे, कुकीज

बिस्किटे, कुकीज प्रामुख्याने गव्हाच्या मैद्यापासून केली जाते. परंतु मैद्यामध्ये साधारणपणे २० ते ५० टक्यांपर्यंत ज्वारीचे पीठ वापरून बिस्किटे, कुकीज व रोल्स बनवता येवू शकते.
Food Processing
Food ProcessingAgrowon

खारी बिस्किटे

बिस्किटे, कुकीज प्रामुख्याने गव्हाच्या मैद्यापासून केली जाते. परंतु मैद्यामध्ये साधारणपणे २० ते ५० टक्यांपर्यंत ज्वारीचे पीठ वापरून बिस्किटे (Biscuits), कुकीज (Cookies ) व रोल्स बनवता येवू शकते.

मधुमेह आणि अतिलठ्ठ पेशंटसाठी हाय फायबर लो कॅलरीज बिस्कीट किंवा कुकीज बनविण्यासाठी नाचणी (Ragi), सोयाबीन (Soybean), ज्वारीच्या माल्ट (Jowar Malt) पिठाचा वापर करता येतो. अशा प्रकारच्या बेकारी पदार्थाची निर्मिती करून ज्वारीचे मूल्यवर्धित पदार्थात रूपांतर करता येते.

Food Processing
Jowar Processing : ज्वारीपासून पोहे, लाह्या

साहित्य

ज्वारीचे पीठ ४०० ग्रॅम, मैदा १०० ग्रॅम, दळलेली साखर १५० ग्रॅम, वनस्पती तूप २०० ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, अंडी २ नग, बेकिंग पावडर अर्धा टी स्पून, बेकिंग पावडर ४ ग्रॅम, पाणी आवश्यकतेनुसार घ्यावे.

Food Processing
Food Processing : प्रक्रिया उत्पादन विक्रीसाठी शेतकरी कंपनीचा ‘पीएस' ब्रॅण्ड

कृती

ज्वारीचे पीठ, बेकिंग पावडर, मैदा एकत्र करून त्याला वनस्पती तूप चोळून घ्यावे. थोड्या पाण्यामध्ये बेकिंग पावडर, मीठ आणि साखर टाकून द्रावण तयार करावे.

हे द्रावण पिठाच्या मिश्रणामध्ये टाकून चांगले मळून घ्यावे. कणीक मळत असतानाच त्यामध्ये फेसाळलेली अंडी टाकून कणीक चांगली मळून घ्यावी. त्या कणकेची ०.५ सेंमी जाडीची पोळी लाटावी आणि बिस्कीट कटरच्या मदतीने विविध आकाराची बिस्किटे तयार करावी.

तयार बिस्किटे भट्टीमध्ये १७ -१८ अंश सेल्सिअस तापमानास १५ ते २० मिनिटे चांगली भाजावीत. थंड झाल्यावर खाण्यासाठी घ्यावीत.

टीप : याचप्रमाणे ज्वारीच्या पिठाची पिठी साखर वापरून गोड बिस्किटे तयार करता येतात. मिठाचा वापर करू नये.

Food Processing
Micro-food processing industries : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांची कर्जासाठी अडवणूक नको

कुकीज

साहित्य

ज्वारीचे पीठ २५० ग्रॅम ग्रॅम, मैदा २५० ग्रॅम, पिठी साखर २५० ग्रॅम ग्रॅम, वनस्पती तूप२०० ग्रॅम, मीठ ५ ग्रॅम, डेक्सट्रोजचे द्रावण ५० मिलि लिटर, वेलदोडा पावडर ५ ग्रॅम, काजू/बदाम पावडर ५ ग्रॅम, बेकिंग पावडर २ ग्रॅम, खायचा सोडा ५ ग्रॅम, पाणी ५० मिलिलिटर.

कृती

ज्वारीचे पीठ, मैदा, वेलदोड्याची पावडर, काजू/बदाम पावडर, बेकिंग पावडर आणि खायचा सोडा एकत्र चाळून घ्यावे. वनस्पती तूप चांगले फेटून मऊ करून त्यामध्ये पिठीसाखर टाकून एकजीव मिश्रण तयार करावे.

थोडे पाणी घेऊन त्यामध्ये मीठ विरघळून घ्यावे. वनस्पती तूप आणि साखर यांच्या मिश्रणामध्ये मिसळावे.

डेक्सट्रोजचे द्रावणसुद्धा त्यामध्ये मिसळून नंतर पीठाचे मिश्रण त्यामध्ये टाकून चांगले हलक्या हाताने एकजीव करावे.या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करावेत किंवा ०.५ सेंमी जाडीची पोळी लाटून त्याचे बिस्कीट कटरच्या साहाय्याने काप पडून वनस्पती तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवून १८ अंश सेल्सिअस तापमानास १० ते १५ मिनिटे चांगली भाजावीत.

थंड झाल्यावर डब्यात भरून साठवण करावी. १५ ते २० दिवस कुकीजची साठवण करता येते.

(के के वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com