Pomegranate : शेतकरी नियोजन पीक - डाळिंब

ऊपळाई बु. (माढा) येथे महादेव भांगे यांची आठ एकर जमीन आहे. पाच एकरावर साधारणपणे १७०० झाडे आहेत. सिंचनासाठी विहीर आणि बोअरमधील उपलब्ध पाणी ठिबकद्वारे वापरले जाते.
Crop Management
Crop ManagementAgrowon
Published on
Updated on

शेतकरी ः महादेव अनिल भांगे

गाव ः ऊपळाई ता. माढा जि. सोलापूर

एकूण शेती ः ८ एकर

डाळिंब क्षेत्र ः पाच एकर

एकूण झाडे ः १७०० झाडे

ऊपळाई बु. (माढा) येथे महादेव भांगे यांची आठ एकर जमीन आहे. त्यापैकी पाच एकरावर २०२० मध्ये त्यांनी डाळिंबाच्या भगवा वाणाची लागवड आहे. तत्पूर्वी कांदा, ढोबळी मिरची, कलिंगड इत्यादी पिकांची लागवड केली जायची.

Crop Management
Kharip Crop : परभणातील १०८ गावांत हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी

डाळिंब लागवड अडीच-अडीच एकर प्रमाणे क्षेत्रात प्रत्येकी १३ बाय ९ आणि १२ बाय ४ फूट अंतरावर केली आहे. पाच एकरावर साधारणपणे १७०० झाडे आहेत. सिंचनासाठी विहीर आणि बोअरमधील उपलब्ध पाणी ठिबकद्वारे वापरले जाते.

डाळिंब बागेत प्रामुख्याने मृग बहार धरला जातो. बहार धरल्यापासून ते फळ काढणीपर्यंत सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केले जाते.

Crop Management
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

गांडूळखत प्रकल्पाची उभारणी ः

महादेवराव यांनी १२ वर्षांपूर्वी दीड एकर क्षेत्रावर गांडूळखत निर्मिती प्रकल्प सुरू केला. त्यासाठी ३ शेडची उभारणी केली. प्रकल्पामधून दर महिन्याला साधारण १०० ते १२५ टन गांडूळखत निर्मिती होते. साधारण १० हजार रुपये प्रति टन दराने त्याची विक्री केली जाते. यासह दर महिन्याला साधारण ४०० किलो व्हर्मीवॉश तयार होते. त्याची ३० रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते. महादेवराव यांचा संपूर्ण शेतीमध्ये सेंद्रिय घटकांच्या वापर अधिक भर देतात. जेणेकरून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

Crop Management
Sugar Mill : सुधाकरपंत परिचारकांचे पांडुरंग कारखान्याला नाव

हस्त बहराचे नियोजन ः

- डाळिंब बागेत प्रामुख्याने मृग बहार धरला जातो. त्यानंतर १ एप्रिल ते २५ मे या कालावधीत बाग ताणावर सोडली.

- साधारण १० मे रोजी बागेची छाटणी केली. छाटलेल्या फांद्या गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली.

Crop Management
Sugar Export : साखर निर्यातीवर बंधने लादण्याचे धोरण बंद करा

- २० मे ला गांडूळखत ४ किलो, निंबोळी पेंड अर्धा किलो, मासळी खत १ किलो, १०ः२६ः२६ हे खत ४०० ग्रॅम प्रतिझाड प्रमाणे दिले.

- त्यानंतर पानगळ करून २५ मे च्या दरम्यान ड्रीपद्वारे ४ तास पाणी देत बागेचा ताण तोडला.

- बागेत वाढलेले गवत ग्रासकटरने कापून जागेवरच कुजण्यासाठी ठेवले.

- नवीन पालवी आणि फुलकळी येतेवेळी एनएए ची फवारणी केली. त्यामुळे फुलधारणा चांगली होण्यास मदत झाली.

- ड्रीपद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दर ८ दिवसांच्या अंतराने दिल्या.

Crop Management
Sugar Export : साखर निर्यातीवर बंधने लादण्याचे धोरण बंद करा

कीड रोग व्यवस्थापन ः

- पालवी फुटतेवेळी आणि फुलकळी येताना रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या.

- जून-जुलै महिन्यात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी शिफारशीनुसार फवारणी केली.

- बागेत बुरशीजन्य ठिपके, आणि कुजवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. शिफारशीप्रमाणे फवारणी केली.

मागील दहा दिवसातील कामे ः

- मागील आठवड्यात कीडग्रस्त आणि अनावश्‍यक फळांची विरळणी केली आहे.

- पान आणि देठाचे प्रयोगशाळेतून परिक्षण करून खतांचे बेसल डोसचे प्रमाण ठरविले जाईल. त्यानुसार गांडूळखत, निबोंळी पेंड, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या.

- झाडांवरील अनावश्‍यक फुटवे काढून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.

- खोडकीड आणि पिनहोल बोररचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झाडाचे खोड धुवून घेतले.

- ड्रीपमधून पीएसबी आणि केएसबी प्रत्येकी १ किलो प्रमाणे दिले.

- दर ३ दिवसांनी आवश्यकतेनुसार ड्रीपद्वारे सिंचन केले.

आगामी नियोजन ः

- सध्या बागेत फळांचे सेंटिग चांगल्या प्रमाणात झाले आहे.

- कीडग्रस्त आणि जास्त झालेल्या फळांची विरळणी करणार आहे.

- खोडकिडीच्या प्रादुर्भावासाठी झाडांची खोड धुवून घेतले जाईल.

- ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास यांच्या आलटून-पालटून फवारण्या घेतल्या जातील.

- झाडाची पाण्याची गरज पाहून ड्रीपचा कालावधी कमी जास्त केला जाईल.

- साधारण नोव्हेंबर महिन्यापर्यंत फळे काढणीस येतील.

- महादेव भांगे, ९९७०७८७२५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com