Papaya Cultivation : अशी करा पपईची लागवड

Papaya Plantation : पपई लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे फायद्याचे ठरते. पपईची लागवड वर्षभरात मुख्यत्वे जुन-जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी - मार्च या तीन हंगामात करतात.
Salam Kisan
Salam KisanAgrowon
Published on
Updated on

Papaya Farming : पपई लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे फायद्याचे ठरते. पपईची लागवड वर्षभरात मुख्यत्वे जुन-जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी - मार्च या तीन हंगामात करतात. द्विलिंगी जातीची लागवड केल्यास पपई बागेमध्ये १० टक्के नर झाडांची आवश्यकता असते. उभयलिंगी जातीची लागवड करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी पपई पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

पपई

जमिनीची मशागत - अगोदर जमीन नांगरून तयार करावी. जमीन २ ते ३ वेळा वखराच्या कुळव्याच्या पाळ्या मारून घ्याव्या जेणे करून जमीन भुसभुशीत होईल. एकरी सिंगल सुपर फॉस्फेट - १ बॅग (५० किलो) जय संजीवनी - ५ किलो हे घटक शिंपडुन पुन्हा एकदा वखराची पाळी मारून घ्यावी.

रोपांची निवड

उभयलिंगी जाती (नर आणि मादी फुले वेगवेगळ्या झाडावर येणाऱ्या जाती) - फुले विजया, को-५ , को ६, को-७, को-८, कुर्ग हनीडयु, पुसा डेलिसियस, पुसा जांयट, पुसा ड्रॉफ, पुसा नन्हा, सनराईज सोलो, अर्का प्रभात, अर्का सुर्या, वाशिंग्टन

पेपेनसाठी उत्पादनासाठी- को २, पुसा मॅजेस्टी किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही जातीची रोपे तुम्ही निवडू शकता. पपई लागवडीसाठी लागणारी रोपांचे प्रमाण त्याच्या अंतरावर अवलंबून असते. काही शेतकरी बियांपासून रोपे तयार करतात व काही शेतकरी नर्सरीतून रोपे आणून लागवड करतात.

परागीकरण - पपई फळ पिकात नर व मादी झाडे स्वतंत्र असल्याने व अशी झाडे फुलोरा आल्याशिवाय ओळखता येत नसल्याने लागावडीच्या ठिकाणी दोन रोपे लावावी. मादी झाडापासुन उत्पादन मिळत असल्यामुळे या झाडांची संख्या जास्त असणे फायद्याचे असते. बागेमध्ये नर व मादी झाडे वेगवेगळी असल्यास १० टक्के नर झाडांची संख्या विखुरलेल्या स्वरुपात असावी.

लागवडीसाठी खड्डे तयार करणे

बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये खड्डे खोदुन ठेवतात. २.२५ x २.२५ मीटर किंवा २.५० x २.०० मीटर अंतराने लागवड करावी व २ x २ x २ आकाराचे खड्डे खांदून घ्यावे. खड्डे तयार केल्यानंतर खालील घटक टाकावे.

सिंगल सुपर फॉस्फेट - १०० ग्रॅम

चांगले कुजलेले शेणखत - २०० ग्रॅम

हाय पावर - १०० ग्रॅम

शक्ती गोल्ड - १०० ग्रॅम

(वरील घटकांचे प्रमाण प्रति खड्ड्या प्रमाणे दिले आहे.)

Salam Kisan
Fruit Crop Cultivation : नविन फळबागेची लागवड करताना अशी जमीन टाळा

रोपावर प्रक्रिया करणे

रोपांची लागवड करण्यापुर्वी १०० लीटर पाण्यात ह्युमिक जेल १०० ग्रॅम, व्ही-सी.ओ.सी. ५० ग्रॅम मिसळून तयार कलेल्या द्रावणात रोप बुडवून रोपांची लागवड करा.

लागवडीचा कालावधी

पपईची लागवड वर्षभरात मुख्यत्वे जुन-जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी - मार्च या तीन हंगामात करतात. फेब्रुवारी - मार्च महिन्यात लागवड केल्यास ती अधिक फायदेशीर ठरते. यामुळे रिंग स्पॉट या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव उशिरा होतो व फळे जास्त मागणीच्या काळात म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात काढणीस येतात.

पपईमध्ये शक्यतो आंतरपीक घेऊ नये. मात्र आंतरपीक घ्यायचे असल्यास सुरूवातीच्य ६ ते ८ महिन्याच्या काळात मूग, उडीद, चवळी, घेवडा, कांदा, मुळा यांसारखी पीके घ्यावीत.

Salam Kisan
Mango Cultivation : अति घन आंबा लागवड करा

पहिली आळवणी - लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली आळवणी करावी. त्यासाठी ह्युमिक जेल – १०० ग्रॅम, व्ही-सी.ओ.सी. – १०० ग्रॅम, व्ही-गार्ड (१९:१९:१९) – १०० ग्रॅम प्रती १५ लिटर पंपातून द्यावे

ह्युमिक जेल – १ किलो, व्ही-सी.ओ.सी. – १ किलो, व्ही-गार्ड (१९:१९:१९) – १ किलो हे घटक एकरी ठिबक सिंचनातून सोडावेत.

पाणी व्यवस्थापन

हिवाळ्यात साधारणपणे दर १० दिवसांनी तर उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. दुहेरी आळे पद्धती, सरी किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. बागेत अथवा झाडाच्या बुध्यांशी पाणी साचून रहाणे पपईच्या पिकाला धोकादायक ठरते. जास्त पाण्यामुळे झाडाचा बुंधा सडून झाडे कोलमडतात. याउलट पाण्याचा ताण पडल्यास फळाचे पोषण व्यवस्थित होत नाही. म्हणूनच पपईला नियमित आणि आटोपशीर पाणी द्यावे.

दुसरी आळवणी

दुसरी आळवणी (ड्रिंचिंग) लागवडीनंतर ३५ ते ४० दिवसांनी करावी. वरद ऊर्जा – २०० मिली, त्रिकाल – १०० मिली प्रति १५ लिटर पंपातून द्यावे

वरद ऊर्जा – २ लिटर, त्रिकाल – १ लिटर हे घटक एकर ठिबक सिंचनातून सोडावेत.

वरील आळवणी नंतर झाडांच्या खोडांना जमिनीपासून ४० ते ४२ सेमी पर्यंत कार्बन डायसल्फाईड आणि इंडीसिटी मिश्रण किंवा बोअरर सोल्यूशन यांचे बोर्डोपेस्ट करून लावावे.

बागेतील तणांची वेळोवेळी खुरपणी करून बाग स्वच्छ ठेवावी. सुरुवातीच्या काळात योग्य आंतरपिके घेतल्यास तणांची वाढ थांबते. पपईच्या बागेत वर्षातून २-३ वेळा निंदणी किंवा खुरपणी करावी. मात्र १२ ते १५ सें.मी पेक्षा जास्त खोल निंदणी किंवा खुरपणी करावी.

पहिली फवारणी - पहिली फवारणी लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसात करावी.

हयूमिक जेल – २५ ग्रॅम, चॅलेजर – ५ मिली, व्ही-ठोको – २० ग्रॅम, व्ही-प्राईड - १५ ग्रॅम हे घटक १५ लिटर पंपातून फवारावेत.

प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - १० मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी पुन्हा करावी.

खताची पहिली मात्रा

खताची पहिली मात्रा लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावी. यामध्ये १०:२६:२६ - १ बॅग (५० किलो), वरद समृद्धी विकास किट - १ बॅग (२३ किलो) ही खते एकरी रिंगण पद्धतीने द्यावी.

दुसरी फवारणी

दुसरी फवारणी लागवडीनंतर ७० ते ८० दिवसात करावी. अमिनो जेल - २५ ग्रॅम, वरद कॉम्बो - २५ ग्रॅम, व्ही-प्राईड - १५ ग्रॅम, झींकोवीट - २५ ग्रॅम हे घटक १५ लिटर पंपातून फवारावेत.

प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) – १० मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार दुसरी फवारणी पुन्हा करावी.

फळांची काढणी

पपईच्या रोपाला लागवडीपासुन ३ ते ७ महिन्यांनी फुले येतात व त्यानंतर फळे काढणीसाठी चार महिन्यांनी तयार होतात. सालीतील चीक दुधासारखा न निघता पाण्यासारखा निघल्यास सुरूवात झाल्यानंतर व पपईच्या फळावर पिवळा डोळा पडला म्हणजे पपई झाडावरुन काढण्यास तयार झाली असे समजावे. दुरच्या बाजारपेठेस फळे पाठवायची असल्यास फळे टोकाकडील बाजुस पिवळसर होताच काढावी.

( सलाम किसान हे एक सुपर अॅप आहे. वरील माहिती सलाम किसानकडून पुरवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्यक्ष शेतात तांत्रिक माहितीचा अवलंब करावा.)  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com