शेतकरी नियोजन : फळबाग व्यवस्थापन

रत्नागिरी जिल्ह्यातील विभव अभय पटवर्धन यांची वडिलोपार्जित सुमारे ८० एकर आंबा लागवड आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंब्याची सुमारे २००० ते २२०० झाडे आहेत.
Horticulture
HorticultureAgrowon

शेतकरी ः विभव पटवर्धन

गाव ः झाडगाव, ता.जि. रत्नागिरी

फळबाग क्षेत्र ः ८० एकर

नवीन लागवड ः साडे सतरा एकर

रत्नागिरी जिल्ह्यातील विभव अभय पटवर्धन यांची वडिलोपार्जित सुमारे ८० एकर आंबा लागवड (Mango Cultivation) आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंब्याची सुमारे २००० ते २२०० झाडे आहेत. त्यात मुख्यत्वे हापूसची (Alphonso) ३० ते ३२ वर्षे वयाची कलमे आहेत. दरवर्षी हंगामात साधारणपणे ५ हजार पेटी हापूस आंब्याची राज्यभरात ‘श्री’ या ब्रॅण्डअंतर्गत विक्री होते. अभ्यासपूर्ण आणि प्रयोगशिलतेतून दर्जेदार उत्पादन घेण्यावर विभव यांचा भर असतो. (Horticulture)

Horticulture
फळबाग, शेळीपालनातून शेतीचे स्वप्न साकार....

व्यवसाय वाढीसाठी विभव यांनी मागील चार वर्षापूर्वी कोट (ता. लांजा) येथे साडेसहा एकरावर हापूसची २५८ कलमे तर कोतापूर (ता. राजापूर,जि.सिंधुदुर्ग) येथे तीन वर्षांपूर्वी ११ एकरावर २५० पायरी आणि २०० केसर आंबा कलमांची लागवड केली आहे. अशी साडेसतरा एकरावर नवीन आंबा लागवड केली आहे.

Horticulture
राज्याची फळबाग योजना रखडली

आंबा लागवड दृष्टिक्षेपात ः

जुनी लागवड (३० ते ३२ वर्षे)

१) पोचरी (ता. संगमेश्वर) ः ३५ एकरावर ६०० झाडे.

२) आगवे (ता. लांजा) ः ९ एकरावर २८० झाडे.

३) तेरवण (ता.राजापूर,जि.सिंधुदुर्ग) ः १३ एकरावर ५०० झाडे.

नवीन लागवड (३ ते ४ वर्षे)

१) कोट (ता.लांजा) २५८ हापूस कलमे

२) कोतापूर (ता.राजापूर, जि.सिंधुदुर्ग) ः २५० पायरी कलमे, २०० केसर कलमे.

नवीन फळबाग लागवड ः

- कोट (ता. लांजा) येथील जमिनीचा भाग कातळ नसून जमीन दगड-मातीची आहे. जून महिन्यात जेसीबीच्या साह्याने २ फूट खोल खड्डे काढून घेतले.

- काढलेले खड्डे एसएसपी अर्धा किलो, शेणखत आणि गांडूळ खत यांचे मिश्रण ३० किलो प्रमाणे टाकून भरून घेतले.

- लागवडीनंतर कलमांच्या मुळांना वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशकांची मात्रा दिली.

- साडे सहा एकरावर लागवडीसाठी सुमारे २५८ हापूस कलमे लागली. दोन झाडांमध्ये साधारण ३० बाय ३० फूट अंतर राखत जून महिन्याच्या शेवटी कलमांची लागवड केली.

- लागवडीनंतर दर एक दिवसाआड कलमांना पाणी दिले. पुढे पाऊस सुरू झाल्यानंतर पाणी देणे थांबविले. सिंचनासाठी ठिबक संचाचा वापर केला जात नाही. त्याऐवजी कलमांच्या बाजूने गोलाकार चर काढून त्यात पाणी दिले जाते.

लागवडीनंतरचे नियोजन ः

- जून महिन्यात पाऊस सुरु झाल्यानंतर ढगाळ हवामान आणि पाऊस अशा परिस्थितीमुळे कलमांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी कलमांचे वेळोवेळी निरिक्षण केले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महिन्यातून एक वेळ रासायनिक फवारणी घेतली.

- जुलै महिन्यात बागेतील पालापाचोळा गोळा करून कलमाच्या बुंध्यात टाकून त्यावर माती पसरली. जेणेकरून पालापाचोळा कुजून सेंद्रिय घटकांचा पुरवठा होईल.

- पावसामुळे बागेत गवताची वाढ झपाट्याने होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मजूर लावून बागेतील गवत काढून टाकतो. तण नियंत्रणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळला जातो. तसेच उन्हाळ्यात वाळलेल्या गवतामुळे आग (वणवा) लागण्याचे प्रकार टाळले जातात.

- पावसाळा संपल्यानंतर कलमांच्या बुंध्याला मातीची भर देऊन बाजूने काठ्या रोवून आधार दिला जातो.

- कलमांची पांढरी मुळी सुदृढ होण्यासाठी वर्षातून ३ ते साडेतीन महिन्यांच्या अंतराने ह्युमिक ॲसिडची ३-४ वेळा मात्रा दिली जाते. कलमाच्या वयानुसार साधारण १०० ग्रॅम ह्युमिक ॲसिड दिले जाते.

- नवीन कलमांना मोहोर येऊ दिला जात नाही. मोहोर आलाच तर तो

खुडून टाकला जातो. त्यामुळे कलमांची वाढ चांगली होईल.

विभव पटवर्धन, ७६२०२०६८९९

(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com