Orange : शेतकरी पीक नियोजन : संत्रा

यवतमाळ जिल्हा मुख्यतः कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु, पुसद तालुक्यातील आमच्या वेणी गावात सिंचनाच्या पुरेशा सोयी असल्याने शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहेत.
Orange
OrangeAgrowon

शेतकरी : प्रकाश नामदेव खंदारे

गाव : वेणी, ता. पुसद,यवतमाळ

एकूण क्षेत्र : ६ एकर

संत्रा लागवड ः साडे चार एकर

एकूण झाडे ः ६५० झाडे

---------------

यवतमाळ जिल्हा मुख्यतः कापूस उत्पादक (Cotton Grower Belt) जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु, पुसद तालुक्यातील आमच्या वेणी गावात सिंचनाच्या (Irrigation) पुरेशा सोयी असल्याने शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहेत. आमच्या भागात शेतकऱ्यांचा पारंपरिक पिके (Traditional Crop) घेण्यावर अधिक भर होता. मात्र, मागील काही वर्षांपासून मजुरांच्या समस्येमुळे शेतकरी फळपिकांच्या लागवडीकडे (Fruit Crop Cultivation ) वळले आहेत. आज संत्रा (Orance) हे फळपीक आमच्या गावचे मुख्य पीक झाले आहे.

आमच्या कुटुंबीयांची सहा एकर शेती असून त्यात सुमारे साडेचार एकरावर संत्र्याची सुमारे ६५० झाडे आहेत. त्यापैकी २००४ मध्ये १८० झाडे, २००९ मध्ये १५५ झाडे तर २०१३-१४ मध्ये ३१५ संत्रा झाडांची नवीन लागवड लागवड केली आहे. संपूर्ण लागवड १८ बाय १८ फूट अंतरावर केलेली आहे. यासह साधारण दीड एकरावर मोसंबीची १९५ झाडे आहेत. संत्रा बागेत प्रामुख्याने मृग बहार धरला जातो. त्यादृष्टीने सर्व बाबींचे पूर्वनियोजन केले जाते. जुन्या लागवडीतील ३३५ झाडांच्या बागेतून सरासरी २९०० क्रेट (एका क्रेटमध्ये २० ते २२ किलो) फळांचे उत्पादन मिळते. नवीन संत्रा लागवडीतून अद्यापतरी उत्पादन घेतले जात नाही.

Orange
संत्रा फळपिकासाठी विमा योजना

आंतरपीक पद्धतीचा अवलंब ः

- संपूर्ण संत्रा झाडांची लागवड १८ बाय १८ फूट अंतरावर आहे. त्यामुळे बागेत आंतरपिकांची लागवड फायदेशीर असल्याचे कृषी विभागातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यानुसार संत्र्याच्या दोन झाडांमध्ये प्रत्येकी नऊ फुटांवर पेरूच्या सरदार वाणाची तसेच सीताफळाची लागवड केली. परंतु, पेरूची झाडे संत्रा झाडापेक्षा अधिक उंच वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पेरू लागवड कमी केली.

- तसेच आंतरपीक म्हणून उन्हाळी सोयाबीन पिकाची लागवड केली जाते.

- मागील महिन्यात नवीन संत्रा बागेत हळद पिकाची लागवड केली आहे.

मागील कामकाज ः

- मृग बहार धरण्यासाठी मे महिन्याच्या सुरुवातील बाग ताणावर सोडली. दरवर्षी साधारण ३५ ते ४० दिवस बागेला ताण दिला जातो.

- दरवर्षी पावसाच्या पाण्याद्वारे ताण आपोआपच तुटतो. यंदा पाऊस काहीसा लांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजून काही दिवस झाडे ताणावरच राहतील.

- बागेमध्ये अधिक प्रमाणात तण दिसून येत होते. नियंत्रणासाठी कल्टीवेटर मारून बागेतील तण काढून टाकले. त्यानंतर काडीकचरा गोळा करून बाग स्वच्छ करून घेतली.

- जून महिन्याच्या सुरुवातीला एकरी ५ ते ६ ट्रॉली शेणखताची मात्रा दिली. सहा एकरांसाठी सुमारे ३४ ट्रॉली शेणखत लागले.

- नवीन लागवडीत आंतरपिकासाठी हळद पिकाची निवड केली आहे. त्यानुसार साधारण दीड एकरावर हळद लागवडीची कामे पूर्ण केली.

आगामी नियोजन ः

- सध्या बागेत पुरेसा ओलावा असल्याने सिंचनाची आवश्यकता नाही. येत्या काळात पावसाचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल.

- बागेला प्रामुख्याने पाटपाणी दिले जाते. त्याकरिता झाडापासून काही अंतरावर वाफे तयार केले आहेत. त्यामुळे झाडांचा पाण्याशी थेट संपर्क होत नाही. परिणामी पाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण होते.

- आगामी काळात पावसामुळे तणे झपाट्याने वाढतात. तणांची वाढ झाल्यामुळे बागेत डास व किडींचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्याचा परिणाम मृग बहारातील फुलधारेवर होतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार मजुरांच्या मदतीने झाडाभोवतीचे तण काढले जाईल. तसेच बाग स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर दिला जाईल.

- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी वेळोवेळी बागेचे निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार फवारणी घेतली जाईल.

---------------------

- प्रकाश खंदारे, ९८५०४०७२९२

(शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com