Turmeric Nutrient Management : हळदीसाठी ठिबकद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन

Turmeric Crop : शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपर मधील अंतर व ड्रीपरचा ताशी प्रवाह शिफारशीनुसार असावा.
Turmeric Nutrient Management
Turmeric Nutrient ManagementAgrowon

यशदीप गिरासे,अरुण देशमुख

Turmeric Nutrient planning : शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपर मधील अंतर व ड्रीपरचा ताशी प्रवाह शिफारशीनुसार असावा.

हळद पिकासाठी ठिबक सिंचनातून पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास दर एकरी उत्पादन तर वाढतेच शिवाय उत्तम गुणवत्ता मिळते. ठिबक सिंचनाद्वारे वाढीच्या अवस्थेनुसार बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन दररोज पाणी द्यावे. योग्य ती खते रोज ठिबक सिंचनातून आवश्यक तेवढीच द्यावीत. ठिबक सिंचनामध्ये नळीच्या आतून ड्रीपर असणारी इनलाईन ड्रीप पद्धती वापरावी. ठिबक नळीपेक्षा ड्रीपरची निवड महत्त्वाची असते. सर्व ठिकाणी सम प्रमाणात पाणी देणाऱ्या दाब नियंत्रित ड्रीपरचा वापर करावा. शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपर मधील अंतर व ड्रीपरचा ताशी प्रवाह शिफारशीनुसार असावा.

Turmeric Nutrient Management
Sugarcane Nutrient Management : पूर्वहंगामातील उसासाठी ठिबकद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन

जमिनीचा प्रकार---हलकी – कमी खोल---मध्यम ते जास्त खोल भारी जमीन---जास्त खोल भारी जमीन
ठिबक नळीतील अंतर---४ ---४.५ फूट---५ फूट
ड्रीपर मधील अंतर---३० सेंमी.---४० सेंमी.---५० सेंमी.
ड्रीपरचा ताशी प्रवाह---१ लिटर /तास---२ लिटर /तास---२ ते ३ लिटर /तास


Turmeric Nutrient Management
Nutrient : चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थापन

१) ठिबक सिंचन वापरल्यास मुळांशी योग्य ओलावा राखल्याने लवकर व एकसमान उगवण होऊन वाढ जोमदारपणे होते.
२) पाणी, अन्नद्रव्ये कार्यक्षम मुळाच्या कक्षेत दिली गेल्याने पुरेपूर वापर होतो.
३) पाण्यात ५० टक्के, खतामध्ये ३० टक्के बचत आणि वीजेमध्ये ४० टक्यांपर्यंत बचत होते.
४) कंद व कायिक वाढीवर नियंत्रण ठेवता येते. जमिनीतील पाणी व हवा यांचा समतोल राखला जातो.
५) उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होते.
६) मुळांशी योग्य तितकाच ओलावा असावा. प्रमाणापेक्षा जास्त ओलावा झाल्यास कंदकुजीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो.

ठिबक सिंचनासाठी पाण्याची गरज काढण्याचे सूत्र ः
पाण्याची गरज (मिमी.) = बाष्पीभवन (मिमी./दिन) x पीक गुणांक x बाष्पपात्र गुणांक
दर एकरी पाण्याची गरज = एकराचे क्षेत्रफळ (चौरस मीटर) x प्रती दिन पाण्याची गरज
उदा. बाष्पीभवन जर ६ मिमी. / दिन असेल आणि पीक गुणांक ०.५ व बाष्पपात्र गुणांक जर ०.८ धरला तर एकरी पाण्याची गरज = ६ x ०.५ x०.८ x ४००० = ९६०० लिटर /दिन एवढी येते.

ठिबक सिंचनासाठी पाण्याची गरज

पीक वाढीची अवस्था---दिवस ---महिना ---पाण्याची गरज (मिमी.)---पाण्याची गरज
(लिटर / दिन/ एकर)---दोन ठिबक नळी तील अंतर १५० सेंमी. व ड्रीपर मधील अंतर ५० सेंमी. आणि ड्रीपरचा प्रवाह ताशी २ लिटर असेल तर ठिबक सिंचन चालविण्याचा कालावधी (मिनिटे /दिन)

उगवणीची अवस्था ---१ ते २५---जून---३.५---१४,०००---८०
सुरवातीची वाढीची अवस्था---२६ ते ७०---जुलै-ऑगस्ट ---४.५---१८,०००---१००
फुटवा होणे---७१ ते ९०ऑगस्ट -सप्टेंबर ---५.५---२२,०००---१२५
कंद तयार होणे---९१ ते १२०---सप्टेंबर-ऑक्टोबर ---६---२४,०००---१३५

कंद वाढ---१२१ ते १९०---नोव्हेंबर – डिसेंबर ---५.८---२३,२००---१३०
पक्वता ते काढणी---१९१ ते २३०---जानेवारी – फेब्रुवारी ---३---१२,०००---७०
(टीप ः आपल्या विभागातील तापमान आणि बाष्पीभवनानुसार पाण्याची गरज बदलते.)


ठिबकद्वारे खत व्यवस्थापन ः
१) मुळांच्या कक्षेतच खते कार्यक्षमपणे पोहोचवली जातात. निचरा होऊन खत वाया जात नाही.
२) जमिनीमध्ये हवा, अन्न आणि पाणी याचा योग्य समतोल राखला जातो. जमीन कायमस्वरूपी वाफसा अवस्थेत राहते. खत ग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ होते.
३) वाढीच्या अवस्थेनुसार योग्य खते योग्य वेळी योग्य प्रमाणात दिली जातात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात भरीव वाढ होते.
४) कमी पीपीएम पातळीची खते जास्त परिणामकारकरित्या दिल्याने त्याचे जास्त प्रमाणात शोषण केले जाते. उत्पादनात ३० ते ४० टक्के हमखास वाढ होते.

अन्नद्रव्यांची गरज ः
हळदीच्या योग्य वाढीसाठी एकूण १८ अन्नद्रव्यांची गरज असते. पिकाचे योग्य खत व्यवस्थापन करायचे असेल तर वाढीच्या अवस्थेनुसार कमी जास्त प्रमाणात प्रत्येक अन्नद्रव्य योग्य वेळी देणे गरजेचे आहे.
नैसर्गिक अन्नद्रव्ये ः कार्बन, हायड्रोजन ,ऑक्सिजन
मुख्य अन्नद्रव्ये ः नत्र, स्फुरद, पालाश
दुय्यम अन्नद्रव्ये ः कॅल्शिअम, मॅग्नेशिअम,सल्फर
सूक्ष्म अन्नद्रव्ये ः झिंक ,बोरॉन,कॉपर, फेरस,मॅंगनीज ,मॉलिब्डेनम, क्लोरिन, सिलिकॉन, निकेल.

खत व्यवस्थापन ः
१) खत व्यवस्थापन करण्यापूर्वी मातीची तपासणी करून घ्यावी. जेणेकरून कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात उपलब्ध आहेत आणि जमिनीचा सामू किती आहे याचा अहवाल प्राप्त होईल. त्यानुसार खताचे नियोजन करावे.
२) खते देण्यापूर्वी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खताची मात्रा कोणती व किती द्यावी ?, खताची विद्राव्यता तपासावी. खताचे एकसमान वितरण होण्यासाठी व्हेंचुरीचा वापर करावा.

एकरी खत व्यवस्थापन

लागवडीनंतर द्यावयाची खतमात्रा ------------------किलो / एकर
लागवडीनंतर दिवस---एकूण दिवस ---युरिया---अमोनिअम सल्फेट---१२: ६१:००---०:०:५०---१३:०: ४५

३० ते ६०---३०---३०---४५---७.५---१५---७.५
६१ ते ९०---३०---३०---३०---७.५---१५---७.५
९१ ते १२०---३०---७.५---३०---७.५---७.५---७.५
१२१ ते १५०---३०---१५---------------४५---७.५
१५१ ते १८०---३०----------------------६०
एकूण---८२.५---१०५---२२.५---१४२.५---३०

टीप ः ६० ते १५० दिवसा दरम्यान प्रती आठवडा ३ किलो मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे.
दुसऱ्या ते चौथ्या महिन्यापर्यंत महिन्यातून एकदा ०.५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत.यावीत.

-अरुण देशमुख,९५४५४५६९०२
( लेखक नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे येथे कार्यरत आहेत)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com