Binomial system : जिवाणूंना नाव देण्याची नवी पद्धत स्वीकारली

सुमारे ३०० वर्षांपूर्वी वनस्पती आणि सजीवांना शास्त्रीय पद्धतीने नाव देण्याची बायनॉमियल सिस्टिम स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ कार्ल लिन्नाइयस यांनी सुरू केली.
Bacteria
Bacteria Agrowon
Published on
Updated on

सुमारे ३०० वर्षांपूर्वी वनस्पती आणि सजीवांना शास्त्रीय पद्धतीने नाव देण्याची बायनॉमियल सिस्टिम (Binomial system) स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ कार्ल लिन्नाइयस यांनी सुरू केली. हे वर्ष होते १७३७. जगाच्या विविध भागांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि सजिवांच्या वेगवेगळे प्रकार सातत्याने समोर येत होते. बऱ्याच वेळा एका प्रकारामध्ये अनेक विविधता दिसत होत्या. अशा वेळी त्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी योग्य नावे देण्याची गरज भासत होती.

Bacteria
Crop Protection : ट्रायकोडर्मा वापरण्याच्या विविध पद्धती कोणत्या?

त्या वेळी कार्ल लिन्नाइयस यांनी तयार केलेल्या तत्त्वाचा वापर आजही केला जातो. या पद्धतीने वनस्पती, प्राणी किंवा जिवाणूंना नावे दिली जातात. नावाचे दोन भाग असतात. नावातील पहिला भाग म्हणजे गण (genus). एकमेकांच्या जवळ किंवा अत्यंत जवळ असलेल्या

Bacteria
Crop Protection : जास्त थंडी फळपिकांसाठी का आहे हानीकारक?

जातींच्या एकत्रित गटाला गण (genus) असे म्हणतात.

दुसरा भाग त्या गणातील प्रत्येक जातीला दिलेले विशिष्ट नाव होय. उदा. माणसांचा गण आहे होमो. त्यातील आधुनिक माणसांची जात आहे, सेपियन्स. अशाच आपल्या आधीच्या माणसाच्या अन्य जातीही आहेत. होमो निॲण्डरथल्स, होमो इरेक्टस इ. तसेच जिवाणूंचे प्रकार इश्चिरेचिया कोली (Escherichia coli). या पद्धतीमुळे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करताना प्रत्येत जात, प्रजात भिन्नपणे वेगळी ओळखता आणि मांडता येते. त्यामध्ये भाषा किंवा स्थान असे अडथळे राहत नाहीत. एकाच प्रकारच्या घटकांचे गुणधर्म व माहिती एकत्रितपणे मिळू शकते.

नामकरणाचा इतिहास

कोणत्या नव्या जातीला नाव देण्याची प्रक्रिया ही हवेमध्ये किंवा आधाराशिवाय केली जात नाही. एखादा सजीव कोणत्या नावाने किंवा कशा प्रकारे ओळखला जाईल, याची पद्धत आजही तीच आहे. त्याचे नियम किंवा कोड्स ठरलेले आहेत. प्राणी, वनस्पती, शेवाळ, बुरशी, विषाणू, जिवाणू असा प्रत्येकासाठी वेगळा कोड आहे.

त्यातील जिवाणूंसाठीचा कोड १८६७ मध्ये प्रथम तयार झाला. त्यानंतर दर सहा वर्षाने होणाऱ्या इंटरनॅशनल बोटॅनिकल काँग्रेसमध्ये त्यात सुधारणा केल्या जातात. जिवाणूंचा वेगळा कोड १९४७ मध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये या वर्षीच्या इंटरनॅशनल कमिटी ऑन सिस्टिमॅटिक्स ऑफ प्रोकार्योट्‌समध्ये सुधारणा करण्यात आल्या. मात्र तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणांमुळे प्रोकार्योटच्या अभ्यासामध्ये प्रचंड बदल झाले आहे. त्याचा विचार करता सध्याची नावे देण्याची पद्धत पुरेशी नसल्याचे तज्ज्ञांचे मत होते. त्यामुळे नवे, पूरक कोड अंतर्भूत करण्यात आले आहेत.

सध्याची पद्धत आणि तिचे फायदे तोटे

जुनी पद्धत तुलनेने अधिक स्थिर मानली जाते. जेव्हा नव्या जातीचे वर्णन हे संबंधित कोडच्या नियमांशी सुसंगत असेल, तर ते दिलेले नाव अधिकृत केले जाते. ते कायम होते. वेगळी जात म्हणून मान्यता मिळण्यासाठी दोन जातीमध्ये नेमके ठोस फरक असावे लागतात. ते संग्रहालयात किंवा शास्त्रीय पद्धतीने केलेल्या साठवणीतून पुढे आले पाहिजे. उदा. जिवंत घटक किंवा त्यांची चित्रे. मात्र ही जुनी पद्धत प्रोकार्योट्ससाठी तितकीशी योग्य ठरत नव्हती. कारण हे केंद्रकरहित एकपेशीय जीव आहेत. त्यांना सामान्यतः जिवाणू म्हणून ओळखले जात असले, तरी त्यामध्ये जिवाणूंशी काही प्रमाणात साम्य असलेली आणि तरीही स्पष्टपणे वेगळा असलेला आर्चिया हा सूक्ष्मजीवांचा गटही अंतर्भूत असतो.

प्रोकार्योट्स हे इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचरमध्ये प्रोकार्योट्स या नावाने ओळखले जाते. नाव देण्याच्या वेगवेगळ्या नियमांनुसार हे कोड अत्यंत स्पष्ट आणि कडक असले पाहिजेत. केवळ जिवाणूंच्या शुद्ध कल्चर, दोन वेगवेगळ्या देशातील नमुन्यातून उपलब्ध होत असतील, तर त्याला टाइप मटेरिअल म्हणून ओळखले जाते. मात्र एक अडचण आहे, कारण बहुतांश जिवाणू हे निसर्गात शुद्ध कल्चर म्हणून वाढत नाहीत. त्यांची वाढ प्रयोगशाळेत पेट्री डिशेसमध्ये करावी लागते. म्हणजेच सध्याच्या कोडअंतर्गत अनेक जिवाणूंचे नामकरण करता येत नाही.

नव्या नामकरण पद्धतीमुळे जैवविविधतेला लाभ

नव्या पद्धतीमध्ये मूळ प्रकार किंवा टाइप म्हणून डीएनए सिक्वेन्सिंग मान्य करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला सेककोड (SeqCode) म्हणता येईल. या सेककोडच्या निर्मितीमध्ये जगभरातील अनेक जीवशास्त्रज्ञांचा समावेश होता. अशी माहिती या गटामधील प्रिटोरिया विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रो. स्टिफानस नोकोलास यांनी दिली.

या सर्व प्रक्रियेला २०१८ मध्ये अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय जिवाणू टॅक्सोनॉमिक्स गटांच्या कार्यशाळेमध्ये चालना मिळाली. नव्या सेक कोड मान्यता मिळाली असली जुनी शुद्ध कल्चरवर आधारित पद्धत अद्याप सुरू असेल.

या नव्या स्थिर पद्धतीमुळे सर्व प्रकारच्या जिवाणूंना नावे देणे शक्य होईल. त्यामुळे पृथ्वीवरील जैवविविधतेची माहिती शास्त्राला उघड होईल. जिवाणूंच्या साह्याने नवे ॲण्टीबायोटिक्सच्या निर्मितीलाही चालना मिळेल.

आजवर केवळ १८ हजार जातींना कायम आणि अधिकृत नाव देणे शक्य झाले आहे. मात्र प्रोकार्योट्सची संख्या अद्याप ज्ञात नसली तरी लक्षावधीमध्ये नक्कीच आहे. सध्या निसर्गामध्ये मिळालेल्या प्रोकार्योट्सची वाढ प्रयोगशाळेमध्ये करून त्यांचे गुणधर्म पाहावे लागत. मात्र जीवशास्त्र पर्यावरणातील नमुन्यांचे डीएनए तपासून संपूर्ण गुणसूत्रे मिळवता येतील. त्यामुळे त्या जिवाणूंचे गुणधर्म कळू शकतील. भविष्यामध्ये यीस्ट आणि अन्य बुरशींच्या नामांकनासाठीही असे नवे कोड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com