Rabi Jowar : रब्बी ज्वारीमध्ये ओलावा व्यवस्थापन महत्त्वाचे

रब्बी हंगामातील पिकांमध्ये कोळपणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोळपणीमुळे तणांचे नियंत्रण होते. जमिनीत पडणाऱ्या भेगा बुजवल्या जातात. पाण्याचे बाष्पीभवन थांबते. ओलावा जास्त काळ टिकतो. अतिशय कार्यक्षमरीत्या वापरला जातो. एक कोळपणी म्हणजे अर्धे पाणी दिल्यासारखे आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

अवर्षण प्रवण (Rain fed) भागातील रब्बी पिकांच्या उत्पादनवाढीसाठी (Rabi Crop Production) जमिनीतील ओलाव्याचे योग्य व कार्यक्षम व्यवस्थापन (Moisture Management) केले असता उत्पादकता ५१ टक्क्यांनी, तर उत्पादन १० ते २० टक्क्यांनी वाढलेले आहे, असे संशोधनावरून दिसून आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) आणि इक्रिसॅट यांच्या संयुक्त विद्यमाने होप प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर रब्बी ज्वारीची (Rabi Jowar) मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिके घेण्यात आली होती. यामध्ये सिद्ध झाले, की योग्य नियोजन आणि ओलावा व्यवस्थापन केले असता रब्बी ज्वारीचे उत्पादन (Rabi Jowar Production) दुपटीने वाढवणे सहज शक्य आहे.

जमिनीतील उपलब्ध ओलावा कमी होण्याची कारणे ः

कोरडवाहू भागात पडणारा पाऊस (सर्वसाधारण ७०० मिमी) आणि होणारे बाष्पीभवन यांचे व्यस्त गुणोत्तर आहे. पडणाऱ्या पावसापेक्षा होणारे बाष्पीभवन (१५०० मिमी) खूप जास्त आहे.

जमिनीच्या खोलीनुसार ओलावा साठविण्याचे प्रमाण कमी अधिक आहे. अवर्षण प्रमाण विभागात खोल जमिनीचे प्रमाण १८ टक्के असून, मध्यम खोल ते उथळ जमिनीचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ओलावा साठवणूक कमी होते.

Rabi Season
Rabi Jowar : मूलस्थानी जलसंधारणासह सुधारित जातींचा वापर आवश्यक

काळ्या जमिनीमध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे. त्यातील मॉन्टमोरीलोनाइट क्लेमुळे पाण्याचे बाष्प उत्सर्जन झाल्यामुळे जमिनीस भेगा पडतात. त्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातून पाण्याचे बाष्पीभवन होते. सर्वसाधारण जानेवारीपासून उष्णतेत वाढ होते आणि दाणे भरण्याच्या कालावधीपासून पिकास ताण जास्त जाणवतो.

रासायनिक खतांचा असंतुलित वापर : रासायनिक खतांचा बेसल डोस पेरून दिल्यास मुळांची वाढ होते. पुढे पाण्याचा ताण असल्यास मुळे खालच्या थरातून कार्यक्षमरीत्या पाणी शोषून घेऊ शकतात.

प्रति हेक्टरी रोपांची संख्या जास्त ठेवणे ः विशेषतः रब्बी ज्वारीची चाऱ्यासाठी दाट पेरणी केली जाते. त्यामुळे सुरुवातीची वाढ चांगली होते, परंतु जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो. पुढे दाणे भरण्याच्या अवस्थेत ओलावा कमी पडतो, त्यामुळे दाणे न भरता ज्वारी बांड होते.

Rabi Season
Rabi Jowar Sowing : अठरा हजार हेक्टरवर जतमध्ये ज्वारीची पेरणी

मूलस्थानी जलसंधारण आवश्यक ः

अवर्षण प्रवण भागामध्ये पडणाऱ्या पावसाचा अभ्यास केला असता असे आढळून आले आहे, की उत्तर भागात म्हणजे धुळे, नाशिक, नगर जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. दक्षिण भागात म्हणजे सोलापूर, पुणे, सांगली, सातारा भागांत रब्बी हंगामात (सप्टेंबरमध्ये) पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे.

अवर्षण प्रवण भागात जुलै आणि सप्टेंबरमध्ये जास्त तीव्रतेचा पाऊस पडतो. त्यामुळे सर्व पाणी जमिनीत मुरणे शक्य नसते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय करणे गरजेचे आहे.

जास्तीचे वाहून जाणारे पाणी योग्य मार्गाने शेततळ्यात साठवून रब्बी पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी वापरावे. उथळ जमिनीमध्ये उपलब्ध ओलावा अतिशय कमी प्रमाणात साठवला जात असल्यामुळे या जमिनीमध्ये खरीप हंगामाची पिके घ्यावीत. तर फक्त मध्यम खोल ते खोल जमिनीमध्ये रब्बी हंगामातील पिके घ्यावीत. जास्त खोलीच्या (१ मीटरपेक्षा जास्त) जमिनीत दुबार पीक पद्धतीस प्राधान्य द्यावे. खरीप हंगामात लवकर पक्व होणारी कडधान्य वर्गीय पिके घ्यावीत आणि त्यानंतर रब्बी पिके घ्यावीत.

Rabi Season
Rabi Jowar Sowing : रब्बी ज्वारी लागवडीचे पंचसूत्री तंत्रज्ञान

प्रयोगांती असे आढळून आले आहे की, खरिपात उडीद घेऊन रब्बीत ज्वारी घेतली आणि ज्या वेळी खरिपात पेरणीनंतर पाऊस कमी पडला किंवा खूपच उशिरा पडला तर उडीद हिरवळीचे खत म्हणून जमिनीत गाडावे. त्यानंतर रब्बी ज्वारी घ्यावी. खरिपात चांगला पाऊस असेल तर उडीद न गाडता उत्पादन म्हणून घेतल्यास दुबार पीक पद्धतीमधून अधिक उत्पन्न मिळते.

अ वर्षण प्रवण भागातील रब्बी पिकांच्या उत्पादनवाढीसाठी जमिनीतील ओलाव्याचे योग्य व कार्यक्षम व्यवस्थापन केले असता उत्पादकता ५१ टक्क्यांनी, तर उत्पादन १० ते २० टक्क्यांनी वाढलेले आहे, असे संशोधनावरून दिसून आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि इक्रिसॅट यांच्या संयुक्त विद्यमाने होप प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर रब्बी ज्वारीची मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिके घेण्यात आली होती. यामध्ये सिद्ध झाले, की योग्य नियोजन आणि ओलावा व्यवस्थापन केले असता रब्बी ज्वारीचे उत्पादन दुपटीने वाढवणे सहज शक्य आहे.

Rabi Season
Rabi Jowar : रब्बी ज्वारीतील पीक संरक्षणाचे सूत्र

जमिनीतील उपलब्ध ओलावा कमी होण्याची कारणे ः

कोरडवाहू भागात पडणारा पाऊस (सर्वसाधारण ७०० मिमी) आणि होणारे बाष्पीभवन यांचे व्यस्त गुणोत्तर आहे. पडणाऱ्या पावसापेक्षा होणारे बाष्पीभवन (१५०० मिमी) खूप जास्त आहे.

जमिनीच्या खोलीनुसार ओलावा साठविण्याचे प्रमाण कमी अधिक आहे. अवर्षण प्रमाण विभागात खोल जमिनीचे प्रमाण १८ टक्के असून, मध्यम खोल ते उथळ जमिनीचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ओलावा साठवणूक कमी होते.

काळ्या जमिनीमध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे. त्यातील मॉन्टमोरीलोनाइट क्लेमुळे पाण्याचे बाष्प उत्सर्जन झाल्यामुळे जमिनीस भेगा पडतात. त्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातून पाण्याचे बाष्पीभवन होते. सर्वसाधारण जानेवारीपासून उष्णतेत वाढ होते आणि दाणे भरण्याच्या कालावधीपासून पिकास ताण जास्त जाणवतो.

Rabi Season
Rabi Jowar : रब्बी हंगामासाठी ज्वारीचे वाण

रासायनिक खतांचा असंतुलित वापर : रासायनिक खतांचा बेसल डोस पेरून दिल्यास मुळांची वाढ होते. पुढे पाण्याचा ताण असल्यास मुळे खालच्या थरातून कार्यक्षमरीत्या पाणी शोषून घेऊ शकतात.

प्रति हेक्टरी रोपांची संख्या जास्त ठेवणे ः विशेषतः रब्बी ज्वारीची चाऱ्यासाठी दाट पेरणी केली जाते. त्यामुळे सुरुवातीची वाढ चांगली होते, परंतु जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो. पुढे दाणे भरण्याच्या अवस्थेत ओलावा कमी पडतो, त्यामुळे दाणे न भरता ज्वारी बांड होते.

मूलस्थानी जलसंधारण आवश्यक ः

अवर्षण प्रवण भागामध्ये पडणाऱ्या पावसाचा अभ्यास केला असता असे आढळून आले आहे, की उत्तर भागात म्हणजे धुळे, नाशिक, नगर जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. दक्षिण भागात म्हणजे सोलापूर, पुणे, सांगली, सातारा भागांत रब्बी हंगामात (सप्टेंबरमध्ये) पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे.

अवर्षण प्रवण भागात जुलै आणि सप्टेंबरमध्ये जास्त तीव्रतेचा पाऊस पडतो. त्यामुळे सर्व पाणी जमिनीत मुरणे शक्य नसते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय करणे गरजेचे आहे.

जास्तीचे वाहून जाणारे पाणी योग्य मार्गाने शेततळ्यात साठवून रब्बी पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी वापरावे. उथळ जमिनीमध्ये उपलब्ध ओलावा अतिशय कमी प्रमाणात साठवला जात असल्यामुळे या जमिनीमध्ये खरीप हंगामाची पिके घ्यावीत. तर फक्त मध्यम खोल ते खोल जमिनीमध्ये रब्बी हंगामातील पिके घ्यावीत. जास्त खोलीच्या (१ मीटरपेक्षा जास्त) जमिनीत दुबार पीक पद्धतीस प्राधान्य द्यावे. खरीप हंगामात लवकर पक्व होणारी कडधान्य वर्गीय पिके घ्यावीत आणि त्यानंतर रब्बी पिके घ्यावीत.

प्रयोगांती असे आढळून आले आहे की, खरिपात उडीद घेऊन रब्बीत ज्वारी घेतली आणि ज्या वेळी खरिपात पेरणीनंतर पाऊस कमी पडला किंवा खूपच उशिरा पडला तर उडीद हिरवळीचे खत म्हणून जमिनीत गाडावे. त्यानंतर रब्बी ज्वारी घ्यावी. खरिपात चांगला पाऊस असेल तर उडीद न गाडता उत्पादन म्हणून घेतल्यास दुबार पीक पद्धतीमधून अधिक उत्पन्न मिळते.

ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी उपाय ः

जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित जातींची निवड ः जमिनीच्या खोलीनुसार आणि उपलब्ध ओलावा कालावधीनुसार रब्बी पिकांच्या सुधारित / संकरित कमी पक्वता कालावधी आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. उदा. रब्बी ज्वारीच्या उथळ जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली या वाणांची निवड करावी. मध्यम खोल ते खोल जमिनींसाठी फुले सुचित्रा किंवा फुले वसुधा आणि पाणी देण्याची व्यवस्था असेल तर फुले रेवती या जातीची निवड करावी.

वेळेवर पेरणी आणि रासायनिक खतांचा वापर : कोरडवाहू ज्वारीची पेरणी वेळेवर पाऊस पडल्यास १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीतच केली असल्यास चांगले उत्पादन मिळते. पेरणी करतेवेळी ५० किलो नत्र, २५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रती हेक्टरी देणे आवश्यक आहे.

आंतरमशागत ः रब्बी हंगामातील पिकांमध्ये कोळपणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोळपणीमुळे तणांचे नियंत्रण होते. जमिनीत पडणाऱ्या भेगा बुजवल्या जातात. त्यामुळे जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन थांबते. ओलावा जास्त काळ टिकतो. अतिशय कार्यक्षमरीत्या वापरला जातो. रब्बी पिकांमध्ये एक कोळपणी म्हणजे अर्धे पाणी दिल्यासारखे आहे. यासाठी शिफारशीप्रमाणे कोळपण्या कराव्यात.

पहिली कोळपणी तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दुसरी कोळपणी पाचव्या आठवड्यात फासेच्या कोळप्याने करावी, यामुळे पिकांना भर लागते. तिसरी कोळपणी आठव्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी. त्यामुळे जमिनीच्या वरचा घट्ट झालेला थर भुसभुशीत होतो आणि जमिनीस पडलेल्या भेगा बुजविल्या जातात. ओलावा जास्त काळ टिकवून ठेवला जातो. फुले सरी वरंबा टोकण यंत्र आणि रुंद वरंबा सरी पेरणी यंत्र यांचा जाणीवपूर्वक वापर सुरुवातीपासूनच केल्यास ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवला जातो आणि उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ होते.

आच्छादनाचा वापर ः वाळलेले गवत तूरकाट्या इत्यादींचा प्रति हेक्टरी ५ टन आच्छादन केल्यास उष्णतेमुळे उडून जाणारा ओलाव्यात बचत केली जाते. दीर्घकाळ ओलावा टिकविला जातो. आच्छादन ३५ ते ४५ दिवसांपर्यंत करावे.

परावर्तकांची फवारणी ः पाण्याचा ताण बसला असल्यास परावर्तकांची फवारणी (केओलीन १ टक्का किंवा १ टक्का डीएपी किंवा पोटॅशिअम नायट्रेट) फवारणी करावी. दाणे भरण्याच्यावेळी गरज भासल्यास १/३ रोपांची संख्या कमी करावी.

संरक्षित पाणी ः ज्वारी पिकास पाण्याची गरज ४० ते ४५ मिमी असते आणि त्यामुळे पावसाचा खंड पडतो त्या वेळी शक्य असेल तिथे आणि संवेदनक्षम अवस्थेत (उदा. पोटरीच्या वेळी व दाणे भरण्याची वेळ) १ ते २ संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनामध्ये होणारी घट टाळून दुप्पटीने वाढ दिसून येते. यासाठी शेततळ्यातील पाणी वापरावे. पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनाचा अवलंब करावा.

डॉ. विजय अमृतसागर, ९४२१५५८८६७ (विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com