Aloevera Cultiavtion : जाणून घ्या कोरफड लागवडीचे तंत्र?

Aloevera Crop : अनेक शेतकरी कोरफड लागवड व्यावसायीक स्तरावर करताना दिसतात. मात्र स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. लागवड करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Aloevera Cultiavtion
Aloevera CultiavtionAgrowon
Published on
Updated on

Aloevera Cultiavtion Technique : कोरफडीचा उपयोग (Aloevera use) अनेक आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी तसेच कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतो.

कोरफड औषधी गुणांनी युक्त आहे, कोरफडमध्ये असलेले पोषक घटक (Nutritional Value) त्वचेसाठी व केसांसाठी उपयोगी असल्याचे सांगितले जाते.

कोरफडीमध्ये ॲलोईन २० ते २२ टक्के, बार्बालाईन ४ ते ५ टक्के तसेच प्रत्येकी २० प्रकारची जीवनसत्वे, ॲमिनो आम्ल व खनिजे असतात.

अनेक शेतकरी कोरफड लागवड व्यावसायीक स्तरावर करताना दिसतात. मात्र स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. लागवड करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते. पाण्याचा निचरा होणारी, रेताड व हलकी जमीन लागवडीस योग्य असते. उष्ण, दमट व कोरड्या हवामानात पिकाची वाढ चांगली होते.

कोरफड ही बहुवार्षिक औषधी वनस्पती असून साधारणतः १.५ ते २.५ फुटापर्यंत वाढते.

पाने लांब, जाड असून त्यामध्ये गरांचे प्रमाण जास्त असते. पानांची लांबी २५ ते ३० सेंमी तर जाडी ३ ते ४ सेंमी असते. कोरफडीची लागवड कंदाद्वारे केली जाते. जमीन, हवामान

Aloevera Cultiavtion
जाणून घ्या मका लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

लागवड 

लागवड सर्वप्रकारच्या जमिनीमध्ये करता येते. पाण्याचा निचरा होणारी, रेताड व हलकी जमीन लागवडीस योग्य असते.उष्ण, दमट व कोरड्या हवामानात पिकाची वाढ चांगली होते.लागवड १.५ बाय १.५ फूट किंवा २ बाय २ फूट अंतरावर करावी. लागवडीसाठी हेक्टरी १० ते १८ हजार कंद आवश्‍यक आहेत.

Aloevera Cultiavtion
Product Packaging Business: प्रॉडक्ट पॅकेजिंग तंत्र, व्यवसाय संधी जाणून घ्या

पूर्वमशागत

जमिनीची नांगरणी करून २ ते ३ पाळ्या द्याव्यात. जमीन चांगली भुसभुसीत झाल्यावर लागवड करावी.

व्यवस्थापन  

जमिनीची मशागत करण्यापूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत आणि हेक्‍टरी ३५० ते ४०० किलो निंबोळी पेंड खत लागवडीपूर्वी मिसळावी. लागवडीपूर्वी हेक्टरी नत्र ३५ किलो, स्फुरद ७० किलो व पालाश ७० किलो द्यावे.

लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी ३५ ते ४० किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. या पिकास जास्त पाण्याची आवश्‍यकता नसते. पाण्याची उपलब्धता व जमिनीच्या प्रतिनुसार पिकास हलके ते मध्यम पाणी द्यावे. लागवडीनंतर ४० दिवसांनी पहिली खुरपणी करावी.

उत्पादन

प्रतिवर्षी हेक्टरी ११० ते ११५ क्विंटल हिरवी पाने मिळतात.

----------

स्त्रोत - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com