Kesar Mango : शेतकरी नियोजन - केसर आंबा लागवड

अजिंठ्याच्या डोंगराळ पट्ट्यातील माळरानावरील मूकपाठ येथील अशोक सूर्यवंशी यांनी चार वर्षांपूर्वी साडेतीन एकरांवर चार मीटर बाय दीड मीटरवर केसर आंबा कलमांची लागवड केली आहे.
Kesar Mango
Kesar MangoAgrowon
Published on
Updated on

Kesar Mango Cultivation

नाव ः अशोक नवलसिंग सूर्यवंशी

गाव ः मुकपाठ, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद

एकूण क्षेत्र ः साडेतीन एकर

अजिंठ्याच्या डोंगराळ पट्ट्यातील माळरानावरील मूकपाठ येथील अशोक सूर्यवंशी यांनी चार वर्षांपूर्वी साडेतीन एकरांवर चार मीटर बाय दीड मीटरवर केसर आंबा (Kesar Mango Cultivation) कलमांची लागवड केली आहे.

आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनानुसार सूर्यवंशी यांनी बागेचे खत, पाणी आणि फवारणी व्यवस्थापन (Fertilizer Management) ठेवले आहे. सूर्यवंशी यांचे यंदा आंबा उत्पादनाचे (Mango Production) दुसरे वर्ष आहे.

गतवर्षी एकरी सुमारे अडीच टन उत्पादन घेतलेल्या सूर्यवंशी यांनी यंदा किमान पाच टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून बागेचे व्यवस्थापन (mango Orchard Management) सुरू केले आहे. बाग व्यवस्थापनात अशोकराव यांना त्यांचा मुलगा विश्‍वजित यांची मोलाची साथ मिळते.

पावसाळ्यानंतर बाग ताणावर असते. यंदा मात्र जास्त पाण्याचा ताण बागेला बसला. साधारणत: डिसेंबरमध्ये बागेला मोहोर दिसू लागला. त्या आधी आणि नंतर डॉ. कापसे यांनी दिलेल्या नियोजनाप्रमाणे खत, पाणी व फवारणी व्यवस्थापन सुरू ठेवले आहे.

सूर्यवंशी यांच्या बागेचे यंदा उत्पादनाचे दुसरे वर्ष आहे. जूनमध्ये त्यांनी प्रति कलम ६० ग्रॅम नत्र, ३५ ग्रॅम स्फुरद आणि ७० ग्रॅम पालाश आणि पाच किलो शेणखत दिले गेले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये व फेब्रुवारीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशची मात्रा पहिल्या मात्रेप्रमाणे दिली आहे. फर्टिगेशनमधून खते देण्यावर त्यांचा भर आहे.

तिसऱ्या वर्षी नत्र, स्फुरद,पालाशचे प्रमाण अनुक्रमे १०० ग्रॅम, ७० ग्रॅम आणि १०० ग्रॅम प्रति कलम आणि चौथ्या वर्षी नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण नियोजनाननुसार अनुक्रमे १६५ ग्रॅम,

१०० ग्रॅम आणि १३५ ग्रॅम प्रति कलम असणार आहे.

Kesar Mango
Kesar Mango : केसर आंब्याचे पीक व्यवस्थापन कसे कराल?

दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी साधारणत: जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सूर्यवंशी बागेमध्ये ऊस पाचट आणि गहू भुश्‍शाचे आच्छादन करतात. पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी ठिबकचा वापर केला जातो. आच्छादनामुळे पाण्यामध्ये चांगली बचत होते. आळ्यामध्ये ओलावा टिकून राहतो.

कीड, रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशकांच्या फवारणीचे नियोजन केले जाते.

बागेचा ताण तोडताना सुरवातीला प्रति कलम ५ ते ६ लिटर पाणी ठिबकद्वारे दिले जाते. त्यानंतर त्यात २० ते २५ लिटरपर्यंत वाढ केली. मोहर फुटल्यानंतर ते ७५ टक्‍के मोहोर फुटेपर्यंत जवळपास २० दिवस पूर्णत: बागेचे पाणी बंद केले. त्यानंतर कलमाच्या गरजेनुसार पाण्याचे प्रमाण वाढवत नेले जाते.

Kesar Mango
Kesar Mango : ‘केसर’चा वाढवा गोडवा

पुढील पंधरवड्यात नियोजन ः

बागेतील पाचट आच्छादनाची निगा राखणे, कलमांच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन केले जाणार आहे.

कीड, रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे तपासून फवारणीचे नियोजन आहे.

पुढील पंधरवड्यात फळे बोराची आकाराची झाल्यावर त्याची हलकी विरळणी करण्याचे नियोजन आहे.

व्यवस्थापनातील मुद्दे

सिंचनासाठी तीन विहिरी. ८० लाख लिटरचे एक शेततळे.

पाण्याची गरज कमी करण्यासाठी पाचटाचे आच्छादन, ठिबक सिंचनाचा वापर.

तज्ज्ञांच्या सल्ल्याने खत, पाणी, कीडनाशक फवारणी नियोजन.

बोराच्या आकाराची फळे झाली की विरळणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com