Mango : शेतकरी नियोजन पीक ः केसर आंबा

औरंगाबाद जिल्ह्यातील भांडेगाव (ता. खुलताबाद) येथील मिठू एकनाथ चव्हाण हे प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. श्री. चव्हाण यांनी २००१ मध्ये ५ एकर क्षेत्रावर केसर आंबा लागवड केली.
Mango
MangoAgrowon
Published on
Updated on

शेतकरी ः मिठू एकनाथ चव्हाण

गाव ः भांडेगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद

एकूण शेती ः ७ एकर

केसर आंबा ः २ एकर (एकूण झाडे १००)

औरंगाबाद जिल्ह्यातील भांडेगाव (ता. खुलताबाद) येथील मिठू एकनाथ चव्हाण हे प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. श्री. चव्हाण यांनी २००१ मध्ये ५ एकर क्षेत्रावर केसर आंबा लागवड केली. परंतु लागवडीनंतर २०१२ पर्यंत अनेक वेळा पडलेल्या दुष्काळामुळे ५ एकरांपैकी ३ एकर क्षेत्रावरील आंब्याची (Mango) झाडे नष्ट झाली. उरलेल्या दोन एकरांवरील बागेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि योग्य व्यवस्थापन (Mango Management) तंत्राचा अवलंब करत बाग टिकवली. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या अनुभवातून केसर आंबा उत्पादनात सातत्य राखले आहे.

Mango
Mango Production : यंदा केसर आंबा लवकर काढणीस येण्याची आशा ः डॉ. कापसे

उर्वरित क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक एकरावर तूर, आले, कापूस ऊस या पिकांची लागवड केली जाते. तसेच केसर आंबा बागेत विविध पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली जाते. आंबा लागवडीत रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो. फक्त आंतरपिकांना ठिबकद्वारे विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात. बागेत दरवर्षी शेणखताची मात्रा दिली जाते. आवश्यकतेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात. काटेकोर व्यवस्थापनाद्वारे बागेतून दर्जेदार आंबा उत्पादन ते घेतात.

व्यवस्थापनातील बाबी ः

- साधारणतः एप्रिल किंवा मे अखेरपर्यंत सर्व झाडांवरील आंबा फळे काढली जातात. त्यानंतर पुढील हंगामाचे व्यवस्थापन सुरू होते.

- जून-जुलै महिन्यांत झाडांवरील वाळलेल्या फांद्या काढणे बागेची स्वच्छता इत्यादी कामे केली जातात.

- पावसाळ्यापूर्वी बागेत रोटाव्हेटरच्या साह्याने मशागत केली जाते.

Mango
Hapus Mango : हापूसचा हंगाम लांबणार

- ऑगस्ट महिन्यात कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात.

- साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला बाग ताणावर सोडली जाते. हा ताण जानेवारी महिन्यात तोडला जातो. पाटपाणी पद्धतीने सिंचन देत ताण तोडला जातो.

- ताण कालावधीत झाडाभोवती रिंग काढून शेणखताची मात्रा दिली जाते. प्रति झाड उपलब्धतेनुसार शेणखताची अधिक मात्रा दिली जाते.

- नोव्हेंबर महिन्यात झाडाच्या खोडांना बोर्डो पेस्ट लावली जाते.

- आवश्यकतेनुसार मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण केले जाते.

- बागेमध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झाडांचे वेळोवेळी निरीक्षण करत आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर शिफारशीप्रमाणे फवारणी घेतली जाते.

- ताण तोडल्यानंतर बागेत १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जाते.

कीड-रोग व्यवस्थापन ः

सततच्या बदलत्या वातावरणामुळे कीड-रोगांना पोषक वातावरण तयार होते. त्यासाठी सातत्याने कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे निरीक्षण केले जाते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर दिला जातो. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते.

आगामी नियोजन ः

- या आठवड्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाईल.

- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेतील झाडांचे सतत निरीक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणीचे नियोजन केले जाईल.

- काडी मजबूत होण्यासाठी डिसेंबर महिन्यात ०ः५२ः३४ ची फवारणी केली जाईल.

सिंचन व्यवस्थापन ः

सिंचनासाठी श्री. चव्हाण यांच्याकडे दोन विहिरी आणि १ शेततळे आहे. त्यातील उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो. आंबा लागवडीत पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जाते. तर आंतरपिकांमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो. फेब्रुवारी महिन्यापासून मे महिन्यात आंबा काढणी होईपर्यंत १५ दिवसांतून एक वेळ सिंचन केले जाते.

बागेत आंतरपिकांची लागवड ः

केसर आंबा बागेत दरवर्षी विविध आंतरपिकांची लागवड केली जाते. यात प्रामुख्याने कपाशी, आले, हरभरा, लसूण आणि फ्लॉवर इत्यादी पिकांची आलटून-पालटून लागवड होते. आंबा बागेत आंतरपिकांच्या लागवडीमुळे अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याचे श्री. चव्हाण सांगतात.

१२ ते १५ टनांपर्यंत उत्पादनाचा राखला दर्जा ः

अत्यंत साध्या सोप्या मात्र काटेकोर व्यवस्थापनातून श्री. चव्हाण दोन एकर बागेतून दरवर्षी ६ ते ७ टनांपर्यंत केसर आंबा उत्पादन घेतात. यंदाही सरासरी इतके उत्पादन मिळणे त्यांना अपेक्षित आहे. उत्पादित सर्व आंब्याची थेट बागेतूनच नेहमीच्या ग्राहकांना विक्री केली जाते. दरवर्षी साधारण ७० ते १०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे दर मिळतो.

- मिठू चव्हाण, ९६८९७६६९०२

(शब्दांकन ः संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com