
पुणे : कोरोनानंतर वाढलेली खाद्यतेलाची (edible oil) मागणी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे ठप्प झालेली सूर्यफुल तेल निर्यात, यामुळे खाद्यतेलाचे दर(Edible Oil Rate) तेजीत आले. मात्र टंचाईसुद्धा जाणवत असल्याने भारताची आयात कमी झाली. युद्ध सुरू होण्यापूर्वीची शिपमेंट मार्च महिन्यात दाखल झाली. मात्र एप्रिल महिन्यात सोयातेल आणि सूर्यफूल तेल (Sunflower Oil) आयात घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात भारताची मदार पाम तेलावर (palm oil) राहील, असे जाणकारांनी सांगितले.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia- Ukraine war) सूर्यफूल तेल उपलब्ध होत नाही. त्यामुळे भारताने आपला मोर्चा पाम तेलाकडे वळविला. मार्च महिन्यात भारताने पामतेलाची १८.७ टक्के अधिक आयात केली. भारताच्या खरेदीमुळे पामतेलाच्या दरवाढीला आधार मिळत आहे. भारताने फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ५५ हजार टन पाम तेलाची आयात केली होती. तर मार्च महिन्यातील आयात (Import) ५ लाख ४० हजार टनांवर पोहोचली. पाम तेल आयात वाढली असताना सूर्यफूल तेल आयातही अधिक झाली. मार्च महिन्यात सूर्यफूल तेलाची २ लाख १२ हजार टन आयात झाली. फेब्रुवारी महिन्यात १ लाख ५२ हजार टन सूर्यफूल तेल देशात आले. युद्ध सुरू होण्यापूर्वी सूर्यफूल तेलाच्या (Sunflowers Oil) काही जहाजांनी युक्रेन सोडले होते. त्यामुळे मार्च महिन्यातील सूर्यफूल तेल आयात अधिक दिसते.
एप्रिल महिन्याचा आकडा मात्र कमी येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यासाठी कोणत्याही शिपमेंट्स झालेल्या नाहीत. त्यामुळे एप्रिल महिन्यातील आयात ८० हजार टनांपर्यंत कमी होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले. मुख्यतः रशिया आणि युक्रेनमधून निर्यात (Russia - Ukraine Export) थांबल्याचा परिणाम आहे. हे दोन देश सूर्यफूल तेल उत्पादनात आघाडीवर आहेत. या देशांमधून अधिक निर्यात होते. युक्रेन भारताला (India) ६० टक्के सूर्यफूल तेल (Sunflower Oil) पुरवतो; मात्र येथील निर्यात सध्या थांबली आहे. तर रशियावर आर्थिक निर्बंध आहेत. तरीही भाराताने रशियासोबत ४५ हजार टन सूर्यफूल तेलाचे (Sunflowers Oil) सौदे केले. हे तेल एप्रिल महिन्यात भारतात दाखल होईल; मात्र यासाठी भारताला विक्रमी दर द्यावा लागला, असे जाणकारांनी सांगितले.
सोयातेलाची आयात घटली (Imports of soybean oil declined)
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशनने (Solvent Extractors Association) दिलेल्या माहितीनुसार देशात मार्च महिन्यात सोयातेलाची २ लाख ९९ हजार टन आयात झाली. फेब्रुवारीत ३ लाख ७७ हजार टन सोयातेल भारतात आले होते. म्हणजेच मार्चमध्ये आयात ७७ लाख टनांनी कमी झाली. सोया तेलाची प्रमुख पुरवठादार असलेल्या ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये पुरेसा साठा नाही. परिणामी, सोया तेलाचेही (Soybean Oil Rate) दर वाढलेले आहेत. त्यातच टंचाईसुद्धा जाणवत आहे. त्यामुळे भारताने इतर देशांकडे सोया तेलाची (Oil) चाचपणी सुरू केली. त्यात अमेरिका आणि जर्मनीचा समावेश आहे. परंतु या दोन्ही देशांत आधीच सोया तेल कमी असून, मोठा पुरवठ्याची शक्यता नाही, असे जाणकारांनी सांगितले.
पाम तेलावर भागवावी लागेल गरज (Pam Oil)
सध्याच्या परिस्थितीत सोया तेल आणि सूर्यफूल तेल (Sunflower Oil) आयातीत अडचणी आहेत. त्यामुळे खाद्यतेल टंचाई दूर करण्यासाठी पाम तेल हा एकमेव मार्ग दिसत आहे. म्हणून एप्रिल महिन्यात ६ लाख टन पाम तेल आयात (Import) करावे लागेल. इथेही एक अडचण आहे. भारताने खरेदी वाढविल्यास पाम तेलाचे दरही वाढविले जातात. याचा थेट परिणाम देशातील तेल दरावर (Oil Rate) होतो. पाम तेलाचे (Pam Oil) दर वाढल्यास इतरही तेलांचे दर वाढविले जातात. तसेही यंदा सर्वच तेलांच्या दरात तेजी आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.