
रशिया अन युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine standoff) जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. खाद्यतेलाची आयात खंडित झाल्यामुळे देशांतर्गत मागणी अन पुरवठ्यातील तफावत वाढली आहे. या परिस्थितीत वनस्पती तेलाची साठवणूक करू नये, असे आवाहन सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (SEA)केले आहे. बिझनेस स्टँडर्डने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे.
खाद्यतेलाची देशांतर्गत मागणी भागवण्यासाठी केंद्र सरकारकडून खाद्यतेलाची आयात करण्यात येते. रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक बाजारातील खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. तसेच निर्यातदारांकडून भारताला होणारा खाद्यतेलाचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत वनस्पती तेलासकट खाद्यतेलाचे किरकोळ विक्री मूल्य (MRP) वाढले आहे. या पार्श्वभूमीवर एसइएने सर्व सदस्यांना साठवणूक नियंत्रण नियमावलीचे (Storage Control Order) काटेकोर पालन करण्याचा आग्रह धरला आहे.
आपल्या देशातले खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे खाद्यतेलाच्या जागतिक बाजारातील परिस्थिती आणखीच बिघडली आहे. अशा अवस्थेत काही व्यावसायिकांकडून वनस्पती तेलाची, तेलबियांची साठवणूक केली जाते आहे, हा प्रकार अयोग्य असल्याची प्रतिक्रिया एसइएचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे. संघटनेच्या सदस्यांसाठी एसीएकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत.
सर्व सदस्यांनी साठवणूक नियमन आदेशाचे (Storage Control Order) पालन करताना वनस्पती तेल अन तेलबियांचा साठा करू नये. खाद्यतेलाच्या किरकोळ विक्री मूल्यात (MRP) वाढ करू नये, जेणेकरून ग्राहकांची गैरसोय होणार नाही. तसेच सदस्यांनी पुरवठा साखळीत म्हणजेच मागणी व पुरवठ्याची व्यवस्था नेहमीप्रमाणे सुरु ठेवावी.
आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्यतेलाची दर वाढल्याचा पडसाद खाद्यतेलाच्या देशांतर्गत व्यवहारावर उमटले आहेत. भारताला युक्रेनमधून होणारा सूर्यफूल तेलाचा पुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे खाद्यतेलाचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
किरकोळ विक्रीसाठी खाद्यतेल साठवण्याची मर्यादा ३० क्विंटल अशी आहे. ठोक विक्रेत्यांवर ५०० क्विंटलची मर्यादा घालण्यात आली आहे. किरकोळ तेलबिया साठवणुकीसाठी १००० क्विंटलची तर ठोक विक्रेत्यांवर २००० क्विंटलची मर्यादा घालण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.