Citrus Crop Management : वाढत्या उष्णतेत संत्रा, मोसंबी, लिंबू बागेला कसं जपाल?

उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि झळा यांचा परिणाम संत्रा, मोसंबी व लिंबू फळबागांमध्ये होतो. प्रामुख्याने नवीन आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहराची लहान फळांची फळगळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे विविध दुष्परिणाम दिसून येतात.
Citrus Crop Management
Citrus Crop Management Agrowon

उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि झळा यांचा परिणाम  संत्रा (Orange), मोसंबी (Sweet Orange) व लिंबू (Lemon) फळबागांमध्ये होतो. प्रामुख्याने नवीन आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहराची लहान फळांची फळगळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे विविध दुष्परिणाम दिसून येतात.

या दुष्परिणामांचा परिणाम कमी करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेल्या पुढील ओलित  व्यवस्थापन व उपलब्ध साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर करणे गरजेचे आहे.

उष्णतेमुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास  झाडांच्या खोडावरील साली तडकण्याचे प्रमाण वाढू शकते. अशा वेळी झाडाचे बुरशीजन्य व अन्य रोगापासून संरक्षणासाठी खोडाला एक ते दीड मीटर उंचीपर्यंत बोर्डो मिश्रण लावावे.

बोर्डो पेस्ट लावल्याने खोडाचे तापमान कमी राहते.उष्णतेमुळे झाडातील पाणी पर्णोत्सर्जनामुळे अधिक  प्रमाणात हवेत उडून जाते. झाडे निस्तेज व मलूल पडतात.

अशा वेळेस बाष्परोधकाचा वापर करता येतो. उदा. कओेलीन २ टक्के म्हणजेच २० ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ टक्के म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या तीव्रतेने  फवारणी करावी. कओेलीनची फवारणी हलके ओलित कल्यानंतर करावी.

पाणी उपलब्ध असल्यास आंबिया बहराची फळे टिकून ठेवण्यासाठी ओलित सुरू ठेवणे गरजेचे आहे. 

Citrus Crop Management
Banana Management : थंड वातावरणात केळी बागेला कसं जपाल?

ठिबक सिंचनाची सोय असल्यास, संत्रा व मोसंबी (१० वर्षांवरील झाडे) १६० ते १९८ लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड. लिंबू झाडे (१० वर्षांवरील झाडे) १४४ ते १७८ लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे.

ठिबक सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी दांडाने  ७ ते ८ दिवसांनी पाणीपुरवठा करावा. झाडाचे  ओळीमध्ये (दोन्ही बाजूंना) दांड ओढावेत. आळीपाळीने दांडात पाणी सोडावे किंवा अर्ध आळे  पद्धतीने आळीपाळीने अर्धे आळ्यात पाणी द्यावे. 

बागेत आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी स्प्रिंकलर चालू  ठेवावेत. यासाठी स्प्रिकंलरचे रायझर काढून नोझल जमिनीलगत ठेवावेत. 

पाणी खूपच कमी असल्यास विकसित झाडाच्या विरुद्ध दिशला मुख्य खोडाच्या ४ ते ५  फूट दूर २ ते ३ फूट खोल १ फूट रुंद व्यासाचे खड्डे करून त्यामध्ये पाणी भरावे. यामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन फळझाडांचे संरक्षण होते.

लिंबूवर्गीय फळबागेला आंबिया बहरातील नत्राची अर्धी मात्रा दिलेली नसल्यास त्वरित द्यावी. संत्रा व लिंबू बागेमध्ये मृग बहर घेण्याकरिता झाडे मे महिन्यात ताणावर सोडावी. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com