Fertigation : विद्राव्य खतांचा वापर कसा कराल?

पिकासाठी खताची मात्रा ठरवताना अपेक्षित उत्पादन, खतांची शिफारशीत मात्रा यांचा विचार करावा लागतो.
Fertigation Management
Fertigation ManagementAgrowon
Published on
Updated on

कोणत्याही पिकासाठी खताची मात्रा ठरवताना अपेक्षित उत्पादन, खतांची शिफारशीत (Fertilizer Management) मात्रा यांचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाणही माहित असायला हवं. त्यासाठी जमिनीचे माती परीक्षण (Soil Testing) करून घेण आवश्यक आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरूपात म्हणजेच विद्राव्य खतांमधून पिकाच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या क्रियेला ‘फर्टिगेशन’ (Fertigation) म्हणतात. यात खताची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. यामुळे खताची कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार विद्राव्य खतांचा वापर करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

Fertigation Management
Paddy : भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन

नत्रयुक्त खते कशी वापरावीत?


अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड, कॅल्शियम नायट्रेट आणि युरिया ही पाण्यात विरघळणारी नत्रयुक्त खते बाजारात उपलब्ध असतात. पिके नायट्रोजन नायट्रेट रूपात घेतात. अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराइड यातील नत्र थोड्या वेळातच नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते. परंतु या खतामुळे जमिनीतील आंमलता वाढते. त्यामुळे जमिनीचा सामू कमी होतो. परिणामी कालांतराने जमीनी नापीक बनतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी चुना वापरावा लागतो. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात वापरावीत. कॅल्शियम नायट्रेट व सोडियम नायट्रेट यांच्या वापरामुळे जमिनीतील क्षार वाढून जमिनी खारवट होतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. त्यामुळे ही खते पाण्यात विरघळून सुद्धा ठिबक संच्यात वापरता येत नाहीत. युरिया हे सर्व नत्रयुक्त खतांमध्ये सर्वात उत्कृष्ट पाण्यात विरघळण्याची जास्त क्षमता असलेले खत आहे. त्यामुळे ते अधिक प्रमाणात वापरले जाते.


स्फुरदयुक्त खतांचा वापर


यामध्ये सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपी, बोन मिल व रॉक फॉस्फेट हे प्रकार आहेत. यातील बोन मिल व रॉक फॉस्फेट हे अविद्राव्य आहेत. सुपर फॉस्फेट हे सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट या तीन प्रकारात मिळते. सुपर फॉस्फेट पाण्यात विरघळते परंतु त्याची विरघळण्याची क्रिया फार हळू आहे. त्यामुळे ठिबक सिंचनातून हे खत देणे त्रासाचे आहे. त्यामुळे स्फुरदाची मात्रा फॉस्फोरिक ऍसिड मधून देतात. ठिबक संचातून युरिया व सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण देणे अपायकारक आहे. कारण असे मिश्रण एकत्र दिल्यास सुपर फॉस्फेट चे रूपांतर फॉस्फोरिक ऍसिड मध्ये होते व ते वायुरूपी असल्यामुळे संचाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

पालाशुक्त खते


ही खते म्युरेट ऑफ पोटॅश व अमोनियम सल्फेट या स्वरूपात मिळतात. पोटॅश पाण्यात सावकाश विरघळते व आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनातून देता येते.


पाण्यात विरघळणारी खते


याशिवाय सध्या बाजारात नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म मूलद्रव्य यांचे घटक असलेली पाण्यात विरघळणारी खते उपलब्ध आहेत. गरजेनुसार व मात्रा ठरवून ही खते ठिबक संचातून देणे योग्य आहे. ही खते दररोज आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांनी देणे सोयीचे असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com