Weed Control : कसा रोखायचा पिकातील तणांचा प्रादुर्भाव?

Weed Infestation: पिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तण नियंत्रण करणे आवश्यक असते. तण नियंत्रणासाठी एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे असते. परंतु मजुरांची कमतरता असल्यामुळे पीकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा.
Weed Control
Weed ControlAgrowon
Published on
Updated on

Weed Management : पिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तण नियंत्रण (Weed Control) करणे आवश्यक असते. तण नियंत्रणासाठी एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे असते. परंतु मजुरांची कमतरता असल्यामुळे पीकनिहाय योग्य तणनाशकांचा (Weediside) वापर करावा.

तसे पाहायला गेले तर एकात्मिक त्यांना नियंत्रणाच्या विविध प्रकारच्या पद्धती आहेत.यामध्ये पेरणीपूर्व मशागत,लागवड करताना ची मशागत,पिकांची आंतरमशागत, तणनाशकांचा वापर इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.

पिकात वाढणारी तणे

एकदलवर्गीय तण : शिप्पी, लोना, केना, भरड, (नरींगा), घोडकात्रा, वाघनखी, चिकटा, पंधाड, हराळी, लव्हाळा, कुंदा, विंचु, चिमनचारा इ.

व्दिदलवर्गीय तण : दिपमाळा, दुधी, माठ, काटेमाठ, कुंजरु, हजारदाणी, तांदुळजा, रानताग, पेटारी, माका, उंदीरकाणी, शेवरा, रान एरंडी, गाजरगवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथरी, चांदवेल, चंदनबटवा, खांडाखुळी इ.     

Weed Control
Humni Control : खरीपातील हुमणीचा प्रादुर्भाव कसा रोखायचा?

तणामुळे होणारे नुकसान 

पिकाला अन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते

कीड आणि रोंगाचा प्रादुर्भाव वाढतो

कालवे चा-याची वाहक क्षमता घटते.

उत्पादनात घट येते.

मिळणाऱ्या उत्पादनाची प्रत खालावते.

Weed Control
Calf Deworming : वासरांतील जंताचा प्रादुर्भाव कसा रोखायचा?

तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी

ओलितांचे दांड नेहमी तणविरहीत ठेवावेत. 

शेणखत अथवा कंपोस्ट कुजल्यानंतर वापरावे, तसेच खताच्या खडयावर तण वाढु देऊ नये.

शक्य असेल तिथे सलग पिकाऐवजी आंतरपीक घ्यावे.

मजुरांची कमतरता भासल्यास  तज्ज्ञांच्या सल्ल्याने तणनाशकाचा वापर करावा.

तणनाशकाची फवारणी फुट स्प्रेअर अथवा नेंपसॅक पंपाने करावी. त्यासाठी फ्लॅटफॅन अथवा फ्लडजेट नोझल वापरावे.

तणनाशकाची फवारणी केलेला पंप साबणाच्या पाण्याने २ ते ३ वेळा धुवावा व नंतरच किटनाशके फवारणी करीता वापरावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com